सातारा/अनिल वीर : किडगाव, ता.सातारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . मुख्य ठिकाणी झेंडावंदन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणाचा जल्लोष करून पंचशील वंदना घेण्यात आली. नंतर फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच इंद्रजीत ढेंबरे,सदस्य संतोष इंगवले व ग्रामसेवक नितीन पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयीन कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ व आंबेडकर अनुयायी एकत्रित येऊन जयंती उत्सवाच्या ठिकाणी सर्वांनी पंचशील व वंदना ग्रहन करण्यात आली. यावेळी किडगाव ग्रामस्थ यात्रा कमिटी अध्यक्ष दत्तात्रेय इंगवले, उपाध्यक्ष बाळासाहेब इंगवले, सचिव चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील टिळेकर मॅडम,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घोलप व काकासाहेब टिळेकर, संतोष टिळेकर, किरण पवार माजी सरपंच चोरगे, चंद्रकांत टिळेकर, मोहन घोलप,बी. घोलप,राहुल घोलप, बाळकृष्ण काकडे,अंकुश गंगावणे,रमेश घोलप, तसेच युवक, महिला व युवती मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.जयंती उत्सवाचे नियोजक ब्लू स्टार ग्रुपचे अध्यक्ष अक्षय घोलप यांच्या नेतृत्वाताखाली व वंचित संघर्ष मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव साजरा करण्यात आला.याकामी,मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते निरंजन घोलप,आकाश घोलप, शरद घोलप,निखिल घोलप,शशिकांत होवाळ, सागर काकडे, आदित्य घोलप, घोलप, बबलु घोलप, कुलदिप घोलप, भास्कर घोलप, चंद्रशेखर घोलप,गोट्या गाडे आदी कार्यकर्त्यांनी अथक असे परिश्रम घेतले.