शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये जमावबंदी.

0

फलटण प्रतिनिधी :

                        शनिवार दि.22 एप्रिल रोजी फलटण शहरामध्ये दोन गटांनी शिवजयंती साजरी करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. फलटणचे प्रांताधिकारी यांनी हे आदेश लागू केले  असून मिरवणुका, सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

                    फलटणमध्ये  दरवर्षी अक्षय तृतीया या दिवशी  शिवजयंतीची मिरवणूक काढली जाते. यंदा शिवजयंतीच्या अध्यक्षपदावरून वाद झाल्याने फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती आणि फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती असे गट निर्माण झाले. दोन्ही गटांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या मिरवणुका एकाच वेळेस काढण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाने तडजोड करण्याचा प्रयत्न केला. त्यातून कोणताही पर्याय समोर न आल्याने प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. दोन्ही गटांनी वरील ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे. दरवर्षी प्रमाणे शनिवार दि. 22 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दर्शन अभिवादन यासाठी मुभा असून प्रशासनातर्फे हा कार्यक्रम करण्यात येणार आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here