विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लगत आहे रस्ता
(अशोक आव्हाटे) कोपरगाव :- कोपरगाव शहराच्या बाहेरून जाणारा अहमदनगर मनमाड महामार्गावर गतिरोधक नसल्या मुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे येवला नाका चौफुलीवर अक्षरशः अपघातांची मालिका सुरु आहे. महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरणार आहे.
दोन महिन्या पूर्वी जीवघेण्या खड्ड्या मुळे अहमदनगर मनमाड महामार्गा वर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले.
राष्ट्रीय माहामार्ग परिमंडळ आणि मालेगाव – कोपरगाव टोल कंपनीने या रस्त्यावर टाकळी फाटा चौफुली ते साई कॉर्नर कोपरगाव या रस्त्याची सुधारणा केल्यामुळे नागरिकांची व या वर वाहतूक करणाऱ्यांनी आत्ताच कुठं समाधान व्यक्त केले. तोच या रस्त्यावर डागडुजी नंतर येवला नाका चौफुली येथे तसेच साई कॉर्नर या ठिकाणची जुनी गती रोधके काढून टाकल्यामुळे यावर वाहतूक करणारे अवजड वाहने व मोटार गाड्या यांचे वर कुठलेही गतीचे नियम बांधील राहिले नाही भरघाव वेगा मुळे या मुळे या मार्गावर सर्व सामान्य नागरिकांना या रस्त्या वरून ये-जा करणे मोठ्या जिकरीचे झाले आहे. येवला नाका चौफुलजवळ मनमाड कडे जाणाऱ्या मार्गिकेवर गतिरोधकांऐवजी केवळ पांढरे पट्टे मारले आहे. जिथे वाहतूक पोलिसांना पाहून वाहन चालक ब्रेक मारत नाही तेथे या पांढऱ्या पट्ट्यानां कोण जुमानणार ! नेमके याच परिसरात शारदा शाळा , एस एस जी एम , संजीवनी महाविद्यालयाकडे जाण्यासाठी हा रास्ता ओलांडून जावे लागते अशावेळी एखादे भरधाव वाहन आल्यास पादचारी , विद्यार्थ्यांची अक्षरशः गोंधळ उडतो . येवला चौफुली वरील ठिकाणी लवकर गतिरोधक न बसविल्यास मोठा अपघात होऊ शकतो तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून त्वरित गतिरोधक बसवावे अशी नागरिकां मधून मागणी होत आहे.