निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांच्याकडून राजमुद्रेची विटंबना

0

चौकशी करण्याची राष्ट्रीय दलित पॅंथरची मागणी

संगमनेर : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि  निमोणचे सरपंच संदीप भास्कर देशमुख यांनी भारतीय राजमुद्रेचे विटंबन केले असून याप्रकरणी तातडीने चौकशी करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅंथरच्या वतीने करण्यात आली आहे.
          राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राजू खरात,  प्रवीण गायकवाड ,अमित चव्हाण, विजय पांढरे, रवींद्र गिरी, संतोष घेगडमल, प्रशांत घेगडमल,संदीप दळवी, सुनील रोकडे, उत्तम टपले, राजेंद्र आव्हाड, रवींद्र कानकाटे, प्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते.निमोण गावचे  सरपंच संदीप भास्करराव देशमुख व इतर ३० ते ३५ युवकांनी संगमनेर शहरात मोटारसायकलवर येऊन जात पडताळणीच्या भारतीय राजमुद्रा असलेल्या झेरॉक्सच्या प्रति संगमनेर शहरात अनेक ठिकानी तसेच रोडवर विमान करून उडविल्या. तसेच या राजमुद्रा असलेल्या अनेक प्रति विविध ठिकाणी पायदळी तुडविल्या गेल्या.भारतीय राज्यघटना व संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा धर्मग्रंथ असून तो मानवतेचा सन्मान करणारा धर्मग्रंथ आहे.मात्र या विकृत प्रवृत्तीने अशा पद्धतीने राजमुद्रेचे विटंबन करून एक प्रकारे संविधानाचा अपमान केला आहे. हे वर्तन अत्यंत चुकीचे असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सदर तरुणांनी केलेले हे गैरकृत्य एकदम चुकीचे व बेशिस्त आणि समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे राजू खरात यांनी म्हटले असुुन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी यावेळी राष्ट्रीय दलित पॅंथरने केली असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा दलित पॅंथरच्या वतीने  आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here