देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगर पालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पोकळे तर व्हा.चेअरमनपदी ताराबाई टिक्कल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
देवळाली प्रवरा नगर पालिका सेवकांची पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चेअरमनपदी राजेंद्र पोकळे व व्हा.चेअरमनपदी ताराबाई टिक्कल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्था स्थापने नंतर पहिल्यांदा संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड केल्याबद्दल देवळाली प्रवरा नगर पालिका विभाग प्रमुख व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी वसुली विभाग प्रमुख मनोज कुमार पापडीवाल, पाणी पुरवठा व आरोग्य विभाग प्रमुख अमोल दातीर, कृष्णा महांकाळ, अजय कासार, बाबासाहेब टिक्कल, सेवानिवृत्त कर्मचारी रंगनाथ होले.कुंडलिक खरात, राजेंद्र कदम,अंबादास अटक,प्रणव कदम,श्रामती शोभा गांधले आदी उपस्थित होते.
संस्था स्थापन झाल्या नंतर पहिल्यांदी संचालक मंडळाच्या बिनविरोध मध्ये राजेंद्र पोकळे, ताराबाई टिक्कल, पांडुरंग कराळे,संतोष खेडकर,रतनबाई दळवी,बाळासाहेब भोंडवे,गोरख भांगरे, सुनिल कल्हापुरे,अजिज मुसमाडे,बबन शिंदे,दिपक फुलारी आदींची समावेश आहे. यावेळी सत्कारास उत्तर देताना चेअरमन राजेंद्र पोकळे म्हणाले की,संस्थेचा कारभार करताना सभासदांच्या विश्वासाला तडा जावू दिला नाही. आमच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञ संचालन व आभार प्रदर्शन कृष्णा महांकाळ यांनी केले.