मारुती गाडीवान यांचा शेवगाव पोलिसात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल ; पोलिसांना सापडेनात आरोपी
शेवगाव — ( जयप्रकाश बागडे )
शेवगाव तालुक्यातील मौजे मुरमी येथील मारुती रंगनाथ गाडीवान हे आपल्या घरी काल 25/ 4 /2023 रोजी सकाळी 1० वाजल्याच्या सुमारास घरासमोर बसले असता गावातीलच अमोल रोहिदास भोसले , सोमनाथ रोहिदास भोसले , रोहिदास भीमराव भोसले , भीमराव शामराव भोसले हे आले असता मला दमदाटी करत म्हणाले की, शेवगाव पोलीस स्टेशनला तू आमच्याविषयी फिरण्यात दिलेली आहे ती मागे घेतोस का नाही अन्यथा तुला व तुझ्या पत्नीला कधीही रात्री येऊन ठार मारू अशा प्रकारची धमकी दिल्याने शेवगाव पोलिसात याबाबत दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला असून देखील शेवगाव पोलिसांना अद्याप पर्यंत आरोपी मात्र सापडत नसल्याने पोलिसाबाबत गावकऱ्यात शंका उत्पन्न होऊ लागली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , शेवगाव तालुक्यातील मौजे मुरमी येथील मारुती रंगनाथ गाडीवान वय 75 यांची मुरमी शिवारात शेती असून गट नंबर 40 मधील शेत जमिनीतील विहिरीत अर्धा हिस्सा म्हणून रोहिदास भीमराव भोसले यांना देण्यात आलेला असून चार दिवसाची दोघात पाण्याची बारी असते , दि .3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मी व माझी पत्नी शारदा घरी जेवण करीत असताना आमचे गावातील अमोल रोहिदास भोसले , सोमनाथ रोहिदास भोसले ,रोहिदास भीमराव भोसले , भीमराव शामराव भोसले सर्व राहणार मुरमी येथील व रोहिदास भोसले यांचा मेहुनिचा मुलगा जालिंदर हे आमच्या घरात आले व म्हणाले, आमची पाण्याची बारी असताना तुम्ही विहिरीतील पाणी का उपसले , मी त्यांना म्हणालो की आजचा दिवस माझी बारी आहे , तुम्ही उद्यापासून विहिरीचे पाणी उपसा , असेच धंदा होऊन सांगत असताना अमोल रोहिदास भोसले आमची बरी असताना तू विहिरीचे पाणी उपसतो तुला आज दाखवतोच असे म्हणून त्याचे हातातील लोखंडी गजाने माझे डावी हाताच्या मनगटावर मारून मला दुखापत करून माझा हात फॅक्चर केला , त्यावेळी सोमनाथ रोहिदास भोसले यांनी लाकडी झाल्याने माझ्या पाठीत मारले , रोहिदास भोसले यांच्या मेहुणीचा मुलगा जालिंदर यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी माझी पत्नी शारदा हि सोडवण्यासाठी आली असता रोहिदास भीमराव भोसले, भीमराव रामराव भोसले यांना ढकलून देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पुन्हा आमच्या नादाला लागल तर मारून टाकू अशी धमकी दिली घराजवळच शेतात राहत असलेले आमचा मुलगा मला व आमच्या पत्नीला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याने पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या सिविल हॉस्पिटल ला रेफर करण्यात आले होते ,मारुती गाडीवान यांच्या जबाबावरून शेवगाव पोलिसात वरील इसमाविरुद्ध 326 , 324 , 452 , 143 , 147 , 148 , 149 , 323 , 504 ,506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता , तरी देखील 25 /4 /2023 रोजी सकाळी 10 चे सुमारास त्यांनी दिलेली फिर्याद मागे घ्यावी यासाठी पुन्हा पत्नीला व मला जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने दुसऱ्यांदा शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मात्र अद्याप पर्यंत आरोपींना अटक केलेली नाही त्याबाबत शेवगाव तालुक्यात तील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे .