देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
दूध भेसळीच्या बातम्यांबाबत सोशल मिडियावर पत्रकारांची बदनामी करणाऱ्या टाकळीमिया येथील अक्षय करपे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राहुरी तालुका मराठी पञकार परिषद व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तहसीलदार चंद्रजीत राजपूत व पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील अक्षय करपे नामक व्यक्तीने फोकस न्यूज नावाने सोशल मिडियावर पत्रकारांची बदनामी होईल या आशयाचा मजकूर प्रसिध्द केला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर त्वरीत कारवाई करावी करुन गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, संजय कुलकर्णी, निसारभाई सय्यद, राजेंद्र उंडे,अशोक काळे, कर्णा जाधव, विनित धसाळ, प्रसाद मैड, श्रीकांत जाधव, गोविंद फुणगे, मनोज साळवे, अशोक मंडलिक, बंडू म्हसे, ऋषी राऊत, मनोज हासे, विजय येवले, महेश कासार, आर.आर.जाधव, आदींसह पत्रकार उपस्थित होते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून याबाबत त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदार राजपूत व पोलिस निरीक्षक डांगे यांनी यावेळी दिले.
