सातारा/अनिल वीर : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांचे निधन झाले आहे.
फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे व राजकीय चळवळीतील एक आक्रमक व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. आंबेडकरी चळवळीतील बेरोजगार तरुणांसाठी बीएसटीमध्ये खोब्रागडेसाहेब चेअरमन असताना अनेक तरुणांना रोजगार मिळवून देणारे एकमेव नेते म्हणजेच मनोजभाई संसारे. कित्येक वर्षे त्यांनी २० मार्च’ला लाखो अनुयायीना त्यांनी अल्पोपहार महाड या ठिकाणी देण्याचे कार्य सतत केलेले आहे. त्याच प्रमाणे ६ डिसेंबर डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्य भूमी येथे अनेक अनुयायी बाहेर गावावरून येणाऱ्या बांधव यांना दर्शन घेता यावे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे नियोजन करून सर्वांना दर्शन व्हावे. यासाठी रात्रं-दिवस समाजाची निस्वार्थपणे सेवा करणारे नेतृत्व म्हणजेच संसारेसाहेब.त्यांना आंबेडकर अनुयायिनी ठिकठिकाणी आदरांजली अर्पण केली आहे.