सातारा/अनिल वीर : तथागतांची मंगल मैत्री रुजवुयात मनामनात पौर्णिमेचा उत्सव साजरा करुयात. घराघरात बुध्द पोर्णिमा तथा बुध्द जयंती सोहळा संपूर्ण विश्वाला प्रज्ञा-शिल- करुणा, मैत्री, प्रेम, मानवता, समतेची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांची जयंती तथा वैशाख पौर्णिमा सोहळा आधुनिक भारत परिवार कडवे खुर्द, ता. पाटण येथे उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.
वैशाखी पौर्णिमा म्हणजेच राजा शुद्धोधन व माता महामाया यांचे पोटी झालेला राजपुत्र सिद्धार्थाचा जन्मदिवस होय. वयाच्या २८ व्या वर्षी राजपाट व सर्व सुखांचा, गृहत्याग करून सत्यशोधनाच्या मार्गात ७ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर वयाच्या ३५ व्यावर्षी राजकुमार सिद्धार्थ यास झालेली ज्ञानप्राप्ती अर्थातच बुद्धत्व प्राप्त झाल्याचा हा मंगलदिन होय. बुद्धत्वप्राप्तीनंतर ४५ वर्ष तथागतांनी समाजातील सर्व स्तरातील घटकांना व राजे – महाराजे यांना सध्दम्माचा उपदेश करून तथागतांचे वयाच्या ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण झाल्याचा दिनही आहे.अशा तिन्ही महत्त्वपुर्ण ऐतिहासिक पवित्र घटनांचा पवित्र दिन म्हणजे बुद्ध पौर्णिमा तथा वैशाख पौर्णिमा होय. आजच्या या मंगल दिनी तथागत भगवान बुद्धांचा जयघोष करीत ध्वजारोहण करून महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. तसेच उपस्थित जनसमुदाय यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. दिवसभरात तथागत भगवान बुद्ध तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सुमधुर अर्थपूर्ण गीत- गायन श्रवण तसेच प्रसाद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान साधनेचा अभ्यासही करण्यात आला. सायंकाळच्या सत्रात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर धम्म उपासिका बाळूताई बबन माने यांनी तथागत भगवान बुद्धांचा जीवनपट असणारा,”पाळणा गीत” सादर केले. आधुनिक भारत परिवारातील युवा सदस्य असणारे प्रसाद सोनावले, पवन माने, प्रणील माने, आर्यन माने, अमित सोनावले ,सुमित सोनावले,रोहित माने, अनिकेत माने,वेदांत माने, प्रियंका माने, रागिनी माने ,गौरी सोनावले यांनी आपल्या मनोगतुन महामानवांचे प्रबोधनात्मक विचार मांडले.प्रसाद सोनवणे यांनी आभार मानले.