संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल सी. बी. एस. सी. बोर्ड ई १० वी आणि १२ वीचा १०० % निकाल

0

स्नेहल खंडीझोड या दहावीच्या विद्यार्थिनीने ९७.६० % गुण मिळवीत तालुक्यात दुसरा क्रमांक
कोपरगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी विद्यालयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल १०० % लागला असून विद्यालयाचे विद्याथी उत्कृष्ट गुणांनी पास होत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. तसेच स्नेहल खंडीझोड या दहावीच्या विद्यार्थिनीने ९७.६० % गुण मिळवीत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. यावर्षीच्या निकालासोबत शाळेची इ. १२ वी ची बारावी बॅच व इ. १० वीची सतरावी बॅच उत्तीर्ण झाली आहे. इयत्ता १२ वी सायन्स ची सलग बारावी बॅच असून यामध्ये
प्रथम – भाग्यश्री भरत संघवी- (५०० पैकी ४१८ गुण- ८३.६%)

द्वितीय – जिनेशा भरत संचेती-(५०० पैकी ४०१ गुण – ८०.२%)

तृतीय क्रमांक – अनुज सोपान जुंधारे -(५०० पैकी ३९९ गुण – ७९.८%)

तसेच इयत्ता १० वी ची १७ वी बॅच असुन यामध्ये

प्रथम – स्नेहल वाल्मीक खंडीझोड (५०० पैकी ४८८ गुण – ९७.६%)

द्वितीय – वल्लभ भरत निंबाळकर (५०० पैकी ४६८ गुण – ९३.६%)

तृतीय – सार्थक लालचंद आव्हाड-(५०० पैकी ४६६ गुण – ९३.२१%)

चतुर्थ – प्रणव राजेंद्र काटे (५०० पैकी ४६५ गुण – ९३% )

पाचवा – पार्थ प्रभाकर बारसे (५०० पैकी ४६४ गुण – ९२.८%)

यासह ०९ विद्यार्थी ९५% च्या पुढे गुण मिळविले तसेच ३२ विद्यार्थी ८०% च्या पुढे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे.
या सर्व गुणवंत विदयार्थ्यांचे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती व विश्वस्त प. पु. रमेशगिरीजी महाराज, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर , उपाध्यक्ष विलास कोते पा., सचिव अंबादास अत्रे, विश्वस्त भाऊ पाटील, रामकृष्ण कोकाटे, अॅड. अनिल जाधव, अशुतोष पानगव्हाणे, बाळासाहेब चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीरंग झावरे, व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाश पाण्डेय, सौ. व्ही. एस. परदेशी, संजय दिवटे, शिवप्रसाद घोडके, मेघराज काकडे, डॉ.रविंद्र कोहकडे, राहुल काशिद, सुरज तुवर, आनंद दळवी, नितीन वाकचौरे, कैलास कुलकर्णी, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here