सुभिक्षा ..
जय पराजय फिरे
हीचं तरी रे परिक्षा
नेहमी जिंकायचेचं
स्वप्न रंजीत अपेक्षा …..
अपयश पचणे कटू
अंगात हवी तितिक्षा
करा सिंहावलोकन
का हरलोयं समिक्षा
जे सिकंदर रे त्यांना
जरुर द्यावी सदिच्छा
अहंकारी उन्मादाची
उतरूनि जाते नक्षा
अप्रिय सत्य पचवावे
रूंदवावी नजर कक्षा
सामावून घ्या चुकांस
विस्तृत करायचे वक्षा
उजळा स्वच्छ चांदणे
रे मनातल्या अंतरिक्षा
पाडताळून घ्यावे मना
असो विचार सुभिक्षा
पराजय खरा शिक्षक
तो देणारं योग्य शिक्षा
अनुसरले सुकृत व्रत
जनार्दन सेवकी दिक्षा
2)
तथास्तु ..
मुख्य पद कुणांतरी
हवे होते एकदम
अडीचवर्षे आधीची
निघत नव्हता दम
पदासाठी सारेकाही
त्यात कसली शरम
माराय हवा हातोडा
परिस्थिती जी गरम
भाजून खाती बाकी
पडता जरासे नरम
आधी हातात चाव्या
ते नंतर इमान धरम
म्हणत होते कुणी
विरोधी हवे भक्कम
विरोधी पक्ष नेताही
असावा भला सक्षम
सत्ता गेली निसटून
डोस्के झाले चक्रम
जनता बिचारीभोळी
वाटला केला विक्रम
तथास्तु म्हणे काळ
दूर ते सगळे संभ्रम
स्वप्न पूर्तता दोघांची
झाली अशी एकदम
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996