माताअहिल्या..
पवित्र नर्मदा तीरावर
वसले शहर माहेश्वर
चप्पाचप्पा सांगेकथा
मा अहिल्या होळकर
धर्मपरायण शिलेदार
देई मंदीरं साक्षात्कार
सुधारणा सदा ध्यास
मध्य युगात चमत्कार
कविगायककलाकार
कास्तकार मूर्तीकार
राजाश्रय सन्मानपूर्व
नगराकर्षक आकार
रयतेच्या कल्याणार्थ
योजना सुंदर अपार
पिढ्या वरती केलेले
उपकार ते अपरंपार
गा-हाणी सोडविण्या
दररोज भरवे दरबार
शेती पूरक योजनांनी
धान्यकोठार ये उभार
एका हाती शांत शंभो
दुस-या हाती तलवार
राजकर्ती माहिश्मती
पुण्यश्लोकी अवतार
महिलाअसूनि सबला
राज्या मनोहर आकार
राज्यकर्ती अशी खास
युगे करतात नमस्कार
अहिल्याई ..
समतोल सम्राज्ञी ती
अहिल्या माहिश्मती
मध्ययुग साक्षात्कार
जग पाहते चमत्कृती ….
शिव पिंडी एक करी
शांतरूपी शिवभक्ती
तलवार दुस-याहाती
उग्र रुपात शिवशक्ती…
पुरुषाहून समर्थपणे
महिला विभूषे तख्ती
सती प्रथा नारी व्यथा
केली अत्याचारमुक्ती…..
गुणवंतांना राजाश्रय
रोमा रोमा कलासक्ती
रयत स्नेह सळाळती
देश प्रेम उत्साह रक्ती…..
देवळे उभारले किती
वाहतेयं नर्मदा प्रगती
शत्रू नामोहरम कराया
आग उरात धगधगती
चोर दरोडेखोर बदले
ये मुख्य प्रवाहासंगती…
अहोरात्र रे गात्र गात्र
रयत सेवेत ती दंगती
माहेश्वरी स्थळी जाता
येई साफल्य अनुभूती
अखर्वात एखाद नारी
जन्मा ये अशी विभूती
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..