झगडेफाटा पोहेगाव रस्त्यादरम्यान मयुरेश्वर गणपती जवळ गतिरोधक टाका

0

कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री मयुरेश्वर देवस्थान आहे. गणेश चतुर्थी तसेच इतर दिवशीही हजारो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येथे येतात. मात्र देवस्थानच्या लगतच असलेला कोपरगाव संगमनेर महामार्ग आहे. भाविकांना गणपतीच्या दर्शनासाठी येताना आपली वाहने बाजूला घेणे किंवा पायी चालत येणे मोठे कठीण होते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये मंदिराजवळ गतिरोधक बसवावे अशी मागणी दीपक रोहमारे यांनी केली आहे.

झगडेफाटा ते संगमनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाहतुकीमुळे रस्त्याच्या पश्चिमेस असलेल्या मयुरेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी भाविकांना ये जा करतांना मोठी अडचण निर्माण होते. या रस्त्याने मोठी जड वाहतूक होत असते. मोठे डंपर व कंटेनर चालक आपल्या गतीवर नियंत्रण न ठेवता मंदिर परिसरातून भरधाव वेगाने वाहने घेऊन धावतात.यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कधी कधी तसंनतास ताटकळ थांबवावे लागते. सध्या झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याचे मजबुती करण्याचे काम सुरू आहे. मंदिर परिसरातही रस्त्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र गतिरोधक न बसवल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.गणेश चतुर्थीच्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नगर नाशिक येवला नांदगाव औरंगाबाद अदी परिसरातून भाविक दर्शनासाठी येतात.त्यामुळे या परिसरातून जात असताना वाहनांना नियंत्रण असावे म्हणून श्री मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरात पोहेगाव च्या बाजूने मंदिराजवळ व झगडे फाट्याच्या बाजूने मंदिराजवळ दोन ठिकाणी गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी दीपक रोहमारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here