स्थानीक ..
येण्या पूर्वीच प्रकल्प
मैदान लागले गाजू
विरोधात समर्थनार्थ
विवाद लागले वाजू…
नातवा मिळे फायदा
जमीन विकतो आजू
झापड लावा डोळ्या
नका पाहू आजूबाजू…
सरकारी हेलपाट्यात
चपला लागती झिजू
चुली केंव्हा विकल्या
विस्तव लागला विझू…
धुऊन टाकी अक्कल
गाढवीण वाहते ओझू
सळसळ रक्त आमचे
गारठून लागले थिजू…
रक्कम न झाली जमा
आजही उपाशी निजू
जन्मला नाही फायदा
हक्कस्वाभिमान त्यजू…
सकस जमिनी सोडून
दगडा वरती रोप रुजू
ते भिजले अमृतवर्षेत
चला मुला जहर पाजू…
स्थानिक मग्न कामात
घ्यायची कुठली बाजू
योग्य वेळी करे न्याय
हातात घेऊन तराजू…
दावा ..
साठमारी सुरु होता
विरक्ती आप्ली दावा
काहीच नको आम्हां
पदावरी नाही दावा…
हात दोन्ही सारखेचं
उजवा अथवा डावा
निवृत्तीचा खेळ सारे
उलथू टाकतो डावा…
शर्यत लावून आपण
दुस-यांना बोला धावा
अनुयाई इमानदार ते
करतीलं देवाचा धावा…
फितूर स्वता मारतीलं
शिक्का आपले नावा
भोव-यात भरकटल्या
किनारा गाठती नावा…
भावनेच्या अश्रुधूरात
बदलून जाणारं हवा
उघड विरोध करणारे
आपली करती वाहवा…
नाराज होऊन गेलेला
तो परतून येणारं थवा
भाकरी हळूचं फिरवा
गरम असताना तवा…
असाध्य रोगा वरती
रामबाण चांगली दवा
उजळून जाईलं रयत
भावनेने लावा दिवा….
– हेमंत मुसरीफ पुणे. .
9730306996