शके १९४५, शोभननाम संवत्सर, शनिवार, दि. १७ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी सकाळी ९ वा. १२ मि. पर्यंत नंतर दर्श अमावस्या, चंद्र- वृषभ राशीत, नक्षत्र- रोहिणी दुपारी ४ वा. २५ मि. पर्यंत नंतर मृग, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०३ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. १६ मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – मंगळ लाभयोग व बुध – शुक्र लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाणार आहात. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील.
वृषभ : प्रतिकूलता संपेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मह्त्त्वाच्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : काहींना निरुत्साहीपणा राहील. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. कामे मार्गी लागतील.
सिंह : दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : अनुकूलता लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामातील अडचणी कमी होतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अडलेली कामे पूर्ण कराल.
तुळ : मानसिक अस्वस्थता राहील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन नको. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. कामाचा ताण राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.
वृश्चिक : तुमचे मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण कमी होईल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपेल. सहकार्य लाभेल.
धनु : मनोबल वाढेल. कामाचा ताण दगदग जाणवेल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.
कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन अत्यंत आनंदी राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अनुकूलता लाभेल.
मीन : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४ GARGI JYOTISHAALAYA: गार्गी ज्योतिषालय, सातारा