सोनेवाडी ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्याची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने मागील गलीतास आलेल्या ऊसाला अधिकचा 225 रुपये प्रति मेट्रिक टन उसाचा भाव काढत त्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याने ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना बी भरणं खते व इतर मशागतीसाठी या पैशाचा उपयोग होणार असल्याने शेतकरी सुखावला असल्याचे जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक जयद्रथ होन यांनी सांगत काळे कारखान्याचे अध्यक्ष आ आशुतोष काळे व संचालक मंडळांचे कौतुक केले.
शेतकऱ्यांसाठी आषाढ आणि श्रावण हा महिना खूप जिकरीचा जातो. शेतीसाठी लागणारे खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना वन वन भटकंती करावी लागते.सावकाराकडून किंवा घरातील डाग दागिने गहाण ठेवून शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे कामे उरकावी लागतात. मागच्या खरिपामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने खूप नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास देखील त्यावेळी अस्मानी संकटाने हिरावून नेला. सरकारने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ही आर्थिक मदत जमा झालेली दिसून येत नाही. तालुक्यातील काही भागात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत जमा केली मात्र अजूनही 50 ते 60 टक्के शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.यामध्ये चांदेकासारे व सोनेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
कांद्याला भाव नाही दुधाचे दर पडले यामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या शेती पिके कशी उभी करावी असा प्रश्न पडला होता.मात्र ज्या शेतकऱ्यांचा कर्मवीर शंकराव काळे कारखान्याला मागच्या गळीत हंगामात उस गेलेला होता त्या शेतकऱ्यांना मात्र आता मोठा दिलासा मिळाला असून आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे दुसरे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. पहिले 2500 व आताचे 225 रुपये रुपये देऊन कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला 2725 रुपये आर्थिक भाव दिला असल्याचे लक्षात येते.ऐन शेतकऱ्यांच्या पेरणी काळात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मवीर काळे कारखान्याच्या संचालक मंडळाचे घेतलेल्या या निर्णयाचे जयद्रथ होन आणि आभार मानले आहे.