जामखेड, तालुका प्रतिनिधी :
जामखेड शहरातील खर्डा रोड वरील जामखेड सर्जिकल हॉस्पिटल येथे बार्शी परिसरातील कॅन्सर पिडीत रूग्ण उपचार करून घेण्यासाठी दाखल झाला होता. पाच ते सहा वर्षां पासुन हा रूग्ण या आजाराने त्रस्त होता. या रूग्णाने येथे येण्या आधी तीन ते चार हॉस्पिटल मध्ये उपचार बाबत चौकशी केली होती. परंतु या रूगणास कोठेच दिलासा मिळाला नाही. उपचारा बाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. काही ठिकाणी आपुरी यंत्रणा.. तर काही ठिकाणी पैसाचे कारण पुढे येत होते. या रूगणाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे या रूग्णावर आज पर्यंत उपचार झाले नाहीत.
अशा परिस्थितीत हा रूग्ण जामखेड येथील सर्जीकल व अक्सिडेन्ट हॉस्पिटलमध्ये मोठ्या आशेने दाखल झाला होता…
या हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान या जोडीने कॅन्सर चे आँपरेशन करण्याचे शिव धनुष्य उचलण्याचे ठरवले. आणि डॉक्टर द्वयी आॅपरेशन च्या तयारीला लागले.. भुल तज्ञ डॉक्टर अंकुश पवार यांना पाचारण केले गेले. नगर येथील प्लास्टिक सर्जरी तज्ञ आदित्य दमानी यांना संपर्क साधला. जामखेड येथे हॉस्पिटल मधे बोलवून घेतले. हे चार महारथी कॅन्सर च्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाले बघता बघता या डॉक्टरांनी रूग्णाचे आॅपरेशन यशस्वी केले
अशा उपचारासाठी रूग्णांना मोठ्या शहरात जावे लागत असे. मोठा खर्च येत असे जटिल कठीण अशी शस्त्रक्रिया जामखेड मध्ये करण्यात आली याचा पहिला मान सर्जीकल हॉस्पिटल ने पटकावला आहे. डॉ. सचिन टेकाडे व डॉ खान यांचे जामखेड तालुक्यासह महाराष्ट्रभरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. जामखेड शहर व तालुक्यात या शस्त्रक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. माणुसकी व सेवा भाव समोर ठेऊन या डॉक्टरांनी मोठे आँपरेशन नाममात्र दरात केले आहे. त्यामुळे डॉक्टर द्वयी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.