येवला (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येवला शाखेच्या वतीने येत्या नोव्हेंबर महिन्यात साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी दिली.
परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष सूर्यकांत सस्कर हे होते. साहित्य संमेलनापूर्वी 30 सप्टेंबर पर्यंत राज्यस्तरीय खुली कथा व काव्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर संमेलनाच्या निमित्ताने दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीत कथा व काव्य स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, साहित्य संमेलन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत सुवर्णा चव्हाण यांनी साहित्य संमेलनासाठी तीन हजार रुपये निधी म्हणून अध्यक्ष सस्कर यांचेकडे सुपूर्द केले.
बैठकीस प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, शरद पाडवी, लक्ष्मण बारहाते, सचिन साताळकर, बाळासाहेब सोमासे, डॉ. महेश्वर तगारे, दत्तकुमार उटवाळे, बाळासाहेब हिरे, योगेंद्र वाघ आदी उपस्थित होते.