कोपरगाव : देशातील मदरशे देश विघातक कृतीचे आणि हिंदू महिलांचे धर्मांतर करण्याचे अड्डे झाले असून अशा मदरशे आणि अवैध मशिदीवर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या धर्तीवर बुलडोझर चालविण्याची कारवाई करावी , त्याचप्रमाणे देशामध्ये धर्मांतर विरोधी आणि लव्ह जिहाद विरोधी अत्यंत कठोर कायदा करण्याची मागणी सुरेश चव्हाणके यांनी केली .
काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील युवतीवर अत्याचार करण्यात आला . शहरातीलच एका मदरशांमध्ये सदर युवतीचे धर्मांतर केल्याचा आरोप असून कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आले आहे. या अत्याचाराच्या निषेधार्थ आज गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता . यावेळी चव्हाणके यांनी प्रमुख वक्ते म्ह्णून मोर्चाला संबोधित केले. यावेळी सागर बेग, हर्षदा ठाकूर यांनी देखील उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले या विशालमोर्चाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन संतोष गंगवाल यांनी केले तसेच मोर्चा यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या कोअर कमिटीने अथक परिश्रम घेतले. या मोर्चास कोपरगाव तालुक्यासह शेजारील जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये जवळपास ५० ते ६० हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता. असे असताना ही अत्यंत शांततेत मोर्चा आणि सभा पार पडली

यावेळी चव्हाणके पुढे म्हणाले की, कोपरगाव हे संजीवनी विद्या निर्माण करणारे हे ठिकाण आहे. पूर्व आणि पश्चिमेस लक्ष दिले नाही म्हणून पाकिस्तान व बांगलादेश निर्माण झाले ते टाळायचे असेल तर हिंदू पेटून उठला पाहिजे.
महाराष्ट्रातील हिंदू जागा झाला तर सर्व देशातील हिंदू जागा होईल असा दावा केला आहे. बरेच नागरिक बदनामीच्या भीतीने अन्याय सहन करतात.शहरातील उपनगरांमध्ये जागोजागी अवैध मशिदी उभय रहात आहे. त्या त्वरित हटवा अन्यथा आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. . कोपरगाव
शहरात बाहेरील शहरातूनच नव्हे तर बांगलादेशातून मुस्लिम आणले
आहे. ज्या मदरशात मुलीवर अत्याचार झाला त्या मदर्शवर आणि त्याच्या चालकांवर अद्याप कारवाई का नाही असा सवाल करून यावेळी मध्यप्रदेशात धर्मांतर आणि लव्ह जिहादचे प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून तीस दिवसात न्याय दिला जातो. त्याच धर्तीवर महहराष्ट्रातही लव जिहाद विरोधी जलद न्यायालय आणावे लागेल त्यासाठी राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली.
,
देशभरात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे, राज्यात गोहत्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर मदरशे व मस्जिद बंद केल्या पाहिजे. पाकिस्तानची बरबादीला ३४ हजार मदरशे कारणीभूत असल्याचा आरोप त्या देशाचे लष्कर प्रमुख यांनी केला आहे .तर महाराष्ट्रात हीच मदरशांची संख्या ७४ हजार आहे.
कोणत्याही पक्षात रहा मात्र हिंदू म्हणून एकसंघ रहा; जाती सोडण्यापेक्षा जातीयवाद सोडा
यावेळी चव्हाणके यांनी राजकीय नेते आणि कार्यकर्ते याना आवाहन करताना म्हटले की तुम्ही कोणत्याही पक्षात रहा मात्र हिंदू म्हणून राहा . आणि जाती पातीचे राजकारण करण्यापेक्षाजाती सोडण्यापेक्षा जातीयवाद सोडा असे आवाहन त्यांनी केले आहे.
मोर्चाला मार्गदर्शन करताना सागर बेग म्हणाले की वरील प्रकरणी कोपरगाव शहरातील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या नंतर काही तासात आरोपीस अटक केली त्याबद्दल बेग यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले. मात्र या प्रकरणात हिंदू मुलगा मदत करण्यास गेला असता पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी त्यास मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला. त्याचप्रमाणे कारागृहात बंद असलेल्या आरोपीस पोलिसांनी भ्रमनध्वनी सेवा पुरवली असल्याचा आरोप केला आहे.
रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरून मोर्चाला सुरवात करण्यात आली . राम मंदिर रस्ता, छत्रपती संभाजी महाराज सर्कल , डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा मार्गावरून मोर्चा पुन्हा सभा ठिकाणी आला. या वेळी महिलांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली .
अत्यंत शांततेत पार पडलेल्या या हिंदू जनक्रोश मोर्चासाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक,०५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, राखीव पोलीस दलाच्या ०६ प्लाटून, ३२६ पोलीस अंमलदार, राखीव पोलीस दलाच्या ०३ प्लाटून, ५० महिला राखीव पोलीस असा मोठा पोलीस बंदोबस्त प्रशासनाने ठेवला होता