आरोपी पो. उप नि. नऱ्हेडाचे एक एक प्रताप उघडकीस ; पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल

0

आरोपी पो. उपनिरीक्षक नाऱ्हेडास पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या पोलीसांवर कारवाईची मागणी देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

               फसवणूक प्रकरणात न्याय मागण्यासाठी आलेल्या महिलेशी सलगी साधत त्या महिलेला न्याय देण्या ऐवजी बलात्कार करुन अन्याय केलाच.राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याने पोलीस खात्याला काळीमा फासुन पोलीसांची आब्रु वेशीवर टांगली आहे.सज्जनकुमार नाऱ्हेडा याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.राहुरीतही यापुर्वी अनेक कारनामे केलेले आहेत. पैशासाठी वेठीस धरणारा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. काही महिण्यापुर्वी नाऱ्हेडा याच्या टेबलच्या कप्प्यात विषारी नाग ठेवण्यात आला होता.

                     जमिन खरेदी प्रकरणात दवणगाव येथिल महिलेची देवळाली प्रवरा येथिल प्रशांत बापूसाहेब चव्हाण याने फसवणूक केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला तुमचे काम करुन दिले तर मला काय देणार असे विचारुन मला काय लागते हे समजून घ्या. याबाबत पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे सज्जनकुमार नाऱ्हेडा यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन पिडीत महिलेस नाऱ्हेडा याने घरी बोलावून घेवून बळजबरीने शरीरसंबध केले. पिडीत महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी नाऱ्हेडा याने पिडीत महिलेस 50 लाखाचे अमिष दाखविले. पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल होवू नये म्हणून प्रयत्न केले. राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीसांनी नाऱ्हेडा यास पळून जाण्यासाठी मदत केली आहे. पोलीस ठाणे आवारातील सीसीटिव्ही फुटेज तपाल्यावर सर्व गोष्टी समोर येणार आहे. पळून जाण्यास मदत करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या लेखी पञाद्वारे केली आहे.

              राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याचे या गुन्ह्याच्या निमित्ताने अनेक कारनामे समोर येत आहे.नाऱ्हेडा यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. जामखेड पोलिस ठाण्यात कार्यरत असताना हस्तकामार्फत लाचेची मागणी केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. सध्या हा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिस कोठडीची हवा खावी लागली

आहे.तालुक्यातील अनेक गुन्ह्यात पैशासाठी वेठीस धरण्याचे प्रकार त्याने केले असल्याचे बोलले जात आहे.पोलिस ठाण्याच्या दक्षिण भाग नाऱ्हेडा याच्याकडे होता.प्रत्येक गावात चार पाच तरुण हाताशी धरुन त्यांच्या बरोबर रंगीत संगित पार्ट्या करुन त्यांच्या मार्फत सावज शोधण्याचे काम केले जात होते.

                आ.प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी मांडल्याने त्याचे पडसाद उमटले आहे.पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची हि चौकशीची मागणी आ.तनपुरे यांनी केली आहे.गंभिर गुन्हा दाखल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांना असताना नाऱ्हेडा यास पोलीस ठाण्याच्या आवारातून पळून जावू कसे दिले.नाऱ्हेडा यास फरार होण्यास पोलीस अधिकाऱ्यांची मदत झाली असल्याची चर्चा पोलीस ठाणे आवारात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here