इर्शाळवाडीत बचावकार्य पावसामुळे थांबल, आतपर्यंत १६ मृत्यू, तर १३९ अजूनही बेपत्ता

0

रायगड : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ जणांना शोधण्यात यश आलं आहे. अजून १३९ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफनं ही माहिती दिली आहे.

रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्यामुळे सध्या बचावकार्य थांवण्यात आलं आहे. उद्या सकाळी ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तिथं मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इरशाळवाडीजवळ नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.
बचाव पथकातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
मदतकार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इर्शाळवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे.
अतिमुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.
मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे . विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सर्व माहिती क्रमवार सांगितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच सकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांनी इर्शाळवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच संबंधितांना बचावकार्याबाबत सूचनाही केल्या. “राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे.

ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे NDRF तैनात करण्यात आलेलं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “इर्शाळवाडी गावात जवळपास ४०-४५ घरे आहेत. त्यापैकी १५ ते १७ घरे ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. NDRF, SDRF आणि TDRF यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

इर्शाळवाडी हे गाव उंचावर असल्याने त्याठिकाणी कोणतीही वाहनव्यवस्था, यंत्रसामुग्री पोहोचू शकत नाही. अशा स्थितीत मनुष्यबळाच्या माध्यमातूनच बचावकार्य करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here