जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे पदाधिकारी आग्रही
एस.बी.देशमुख यांची संयुक्त महामंडळाच्या सहसचिवपदी निवड
छ. संभाजी नगर ( औरंगाबाद) :
अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची बैठक जीवन विकास ग्रंथालय औरंगाबाद (संभाजी नगर) येथे महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
यावेळी जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीसाठी मराठवाडा मुख्याध्यापक संघ,विदर्भ मुख्याध्यापक संघ व प.महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाने आक्रमक भूमिका घेतली व ३१ जुलै पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत त्रिस्तरीय कमिटीने योग्य जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाजूने निर्णय दिला नाही तर अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ तीनही विभागात भव्य आंदोलन छेडेल असे लेखी निवेदन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,शिक्षण सचिव,शिक्षण आयुक्त यांना मेलव्दारे निवेदन पाठविले.मागील सात दिवस शाळा बंद आंदोलनात ज्या शाळा सहभागी झाल्या नाही त्यांच्यासह १०० % शाळांनी सहभागी होण्याचे आव्हान केले.व या आंदोलनचे नियोजन संयुक्त महामंडळ पुढील आठवड्यात पुणे येथे होणाऱ्या बैठकीत करणार आहे.
यावेळी सेवा निवृत्त शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शाळेवर नेमणूक करण्याच्या शासन निर्णयास तीव्र विरोध करण्यात आला.सेवा निवृत्त शिक्षक घेण्याऐवजी शिक्षक भरती त्वरित करावी.संच मान्यता आधारकार्ड शिवाय सुधारित करावी व मुख्याध्यापकांनी दिलेली माहिती यावर विश्वास ठेवून संच मान्यता करावी.शिक्षकांचे रखडलेले मेडिकल बिले,पुरवणी बिले,रजा रोखीकरण यांना तत्वत: मान्यता द्यावी.या सर्व विषयांवर वादळी चर्चा होऊन मा.शिक्षण आयुक्त यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जाणार असल्याचे एस.बी.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या अध्यक्ष पदी के.एस.ढोमसे पुणे,सचिवपदी मोतीभाऊ केंद्रे नांदेड,सहसचिवपदी एस.बी.देशमुख नाशिक व सतिश जगताप वर्धा,कार्याध्यक्षपदी मोहन सोनवणे औरंगाबाद व अशोक पारधी भंडारा,उपाध्यक्ष नंदुकुमार बारवकर सोलापूर,प्रकाश देशमुख लातूर,कोषाध्यक्ष विलास भारसाकळे बुलढाणा,देविदास उमाठे परभणी, विद्यासचीव मनोहर पवार कोल्हापूर,दिलीप पाटील उस्मानाबाद,प्रविण दिवे अमरावती,गोंविद फुलवाडे हिंगोली,वार्तापत्रक संपादक प्रमोद नेमाडे पुणे,सज्जन पाटील नागपूर,रोहित जाधव रत्नागिरी यांची निवड करण्यात आली.
प.महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून एच आर.जाधव पुणे,सचिव एस.बी.देशमुख नाशिक, विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड,सचिव सतिश जगताप,मराठवाडा अध्यक्ष संजय शिपरकर नांदेड,सचिव जे.एन.पैठणे बीड,या सर्वांचा सत्कार रावसाहेब आवारी,वसंत पाटील,मारुती खेडकर,भागचंद औताडे,हेमंतराव साखरे व सौ.ममता गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मराठावाडा,प.महाराष्ट्र,विदर्भ या छत्तीस जिल्ह्यातून मोठया संख्येने मुख्याध्यापक उपस्थित होते.