कोपरगाव : उद्या आयोजित मुस्लिम बांधवांचा इस्तेमाचा आणि दिनांक २०/०७/२०२३ रोजी पार पडलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चाचा दुर दुर पर्यंत संबंध नाही किंवा त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी नाही . मात्र काही दिवसांपासून अल्पबुद्धीचे काही व्यक्ती या इस्तेमाचा आधार घेऊन सोशल मिडीयावर चुकीचे व हिंदु मुस्लिमात तेढ निर्माण होतील असे संदेश टाकून शहरात अशांतता निर्माण करण्याचे काम करीत असून अशा प्रवृत्तीचा आणि इस्तेमाचा काहीही संबंध नसून त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे स्पष्टीकरण माजी नगरसेवक महेमूद सय्यद यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सय्यद यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या निंदनीय घटनेचा मुस्लिम समाजाच्या वतीनेही निषेध करण्यात आला होता.त्याचप्रमाणे शासनाकडे सदर घटनेची सखोल चौकशी ची मागणी देखील केली आहे. अशा निंदनीय घटनेचा कुठला ही समाज समर्थन करत नाही आणि करणारही नाही.
कोपरगाव शहरात सालाबाद प्रमाणे .दिनांक २५ जुलै २०२३ रोजी मुस्लिम धर्माचे इस्तेमा (धार्मिक) प्रवचन याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे (स्वरूप हिंदु बांधवांच्या स्वाध्याया प्रमाणे असते.) यात कुठला हि नेता. पक्ष. संघटना कींवा राजकीय विषयावर जाती पातीवर चर्चा होत नाही यात फक्त माणुसकी धर्माची शिकवण दिली जाते. त्याच प्रमाणे व्यसनाधीन व्यक्तींचे प्रबोधन केले जाते. इस्तेमा जिल्हा , तालुका ,महाराष्ट्र कींवा देशपातळीवरही आयोजित केला जातो. तालुक्यातील नागरीकासाठी दर वर्षी प्रमाणे हा धार्मिक उपक्रम (इस्तेमा) आयोजित करण्यात आला आहे. तरी या इस्तेमाच्या आडून कोणीही समाजबांधवाने कुठल्याही पध्दतीचे कोणालाही उद्देशून अथवा वाईट संदेश टाकू नये . या व्यतिरिक्तही जर कोणी अशा प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण करण्याचे संदेश टाकत असल्यास त्याचा आणि इस्तामाचा काहीही संबंध नसून त्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून बंदोबस्त करण्याचे आवाहन सय्यद यांनी केले आहे.