एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये कॉलेज कॅन्टीनचे उद्घाटन संपन्न
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या एस .एस .जी. एम. कॉलेज मध्ये क्लासरूम, क्रीडांगण, ऑडिटोरियम हॉल, यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व कॉलेज कॅन्टीनलाही देण्यात आलेले आहे .महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच कॉलेज परिसरामध्ये पौष्टिक आणि चविष्ट आहार मिळावा म्हणूनच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी कॉलेज कॅन्टीन सुरू केले आहे. या कॅन्टीन चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड .भगीरथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेक कोल्हे व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी चे सदस्य अॅड. संदीप वर्पे, महाविद्यालय समितीचे सदस्य सुनील गंगुले हे आवर्जून उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी अड.भगीरथ शिंदे म्हणाले” कॉलेज कॅन्टीन ही महाविद्यालयातील एक महत्त्वाचा भाग बनली आहे. विद्यार्थ्यांना पोष्टिक चविष्ट अन्न मिळावे फास्ट फूड पासून विद्यार्थी दूर राहावा या हेतू बरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मैत्री भाव वृद्धिंगत व्हावा त्यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाने 17 लाख रुपये खर्च करून दीड हजार स्क्वेअर फुट असलेली सर्व सोयींनी युक्त कॅन्टीनची सोय उपलब्ध करून दिली आहे. या कॉलेज कॅन्टीनचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निश्चितपणे फायदा होईल”
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी आयक्यूएसीचे चेअरमन प्रा डॉ .निलेश मालपुरे , कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर , विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. अरुण देशमुख , कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.अर्जुन भागवत ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक रामभाऊ गमे कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी महाविद्यालय विकास समितीचे प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा. डॉ. देविदास रणधीर प्रा. डॉ. माधव यशवंत सर्व विभागाचे विभाग प्रमुख विद्यार्थी व सहकारी प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते.