जयपूर – मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाचा गोळीबार, चार जणांचा मृत्यू

0

3 प्रवाशांसह एका पोलीस अधिकाऱ्यांचाही मृतांत समावेश

मुंबई ; जयपूर – मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये आज सकाळी पालघरच्या जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवानाला जीआरपीने अटक केली आहे.

जयपूर- मुंबई (गाडी क्र 12956) ही मुंबई सेंट्रलच्या दिशेने जात होती.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, “चेतन कुमार हा आरपीएफ जवान ड्युटीवर होता. त्याने त्याचा सहकारी टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात 3 सहप्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर हा रेल्वे सुरक्षा पोलीस नंतर त्याने चेन ओढली आणि दहीसर आणि मीरा रोडच्या मध्ये उतरला. त्याला भाईंदरच्या आरपीएफ टीमने अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. मृत पावलेल्या तीन नागरिकांची ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे.” या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचं ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here