सातारा : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि.१ ऑगष्ट रोजी सकाळी १०।। वा.महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.बुधवार दि.२ ऑगष्ट रोजी सकाळी १०।। वा. डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळील सांस्कृतिक सभागृहात प्राचार्य भिंगारदेवें यांचे व्याख्यान होणार आहे.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान,त्रिपुडी,ता. पाटण येथेही जयंती साजरी करण्यात येणार आहे.अशीही माहीती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे संस्थापक अनिल वीर यांनी दिली.