देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
मोटारसायकल मध्ये फुकट पेट्रोल टाकण्यास नकार दिल्याने पेट्रोल पंपावरील कामगारास व पंप चालक व इतर कामगारांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप,लाकडी दांड्याने मारहाण करत कामगाराकडील सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांसह अन्य आठ ते नऊ अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना पेट्रोल पंप येथे रविवार सायंकाळच्या सुमारास मोटारसायकलवर तीन व्यक्ती आल्या माझ्या मोटारसायकल मध्ये पेट्रोल टाक माझ्याकडे पैसे नाहीत.पंपावरील कामगाराने फुकट पेट्रोल देण्यास नकार दिला.त्याचा राग आल्याने पंपावरील कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण करुन पेट्रोल विक्रीची रक्कम सुमारे दिड लाख रुपये हिसकावून घेत.कामगाराचा मोबाईल फोडून मारहाण केल्याने कामगारास गंभीर जखमी केले.
पंपा वरील कामगार इमरान खान याच्या फिर्यादी वरुन राहुरी फँक्टरी येथिल तेजस वाघ उर्फ नासक्या, टिंक्या अशोक वडमारे, गणेश तारडे (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांसह आठ ते नऊ अज्ञात व्यक्ती विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं ८३१ / २०२३ भा.द.वि कलम ३२६, १४३,१४७,१४८,१४९, ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. डी कटारे हे करीत आहे.