देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथिल एका कुटुंबातील दोन व एक पुरुष मोटारसायकल वरुन घरी जात असताना येवलेवस्ती दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल काढुन घेण्यात आले.परंतू या प्रकरणी लुटमार झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर पोलीसांनी शस्ञ अधिनियमा नुसार अटक केली असून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनवली आहे.
याबाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहिती आशी की देवळाली प्रवरा येथिल एका शेतकरी कुटुंबातील दोन महिला व एक पुरुष मोटारसायकलवरुन घरी जात असताना राहुरी कारखाना रस्त्यावरील येवलेवस्ती येथे देवळाली प्रवरा येथिल विजय सुनिल आडसुळ व राजु सुरेश गायकवाड या दोघांनी सत्तुर सारख्या धारदार शस्ञाचा धाक दाखवून मोटारसायकलस्वाराकडील मोबाईल लुटुन घेतला होता.याबाबतची माहिती देवळाली प्रवरा पोलीस चौकीत देण्यात आल्यावर पो.ना.राहुल यादव व पो.काँ.शशिकांत वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून त्या दोघांना ताब्यात घेतले. मोटारसायकलवरील दोन महिला व एका पुरुषास फिर्याद दाखल करण्याचे सांगितले असता. त्या कुटुंबाने फिर्याद देण्यास नकार दिल्याने पोलीसाकडे फिर्यादी नसल्यामुळे या दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीसांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशानुसार आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करुन राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पुढील तपास राहुरीचे पोलीस करीत आहेत.