वारणावती वार्ताहर :
आरळा तालुका शिराळा येथे कोकरूड चांदोली मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे वारणा डाव्या कालव्याचे पाणी कोकरुड चांदोली मुख्य रस्त्यावर येत आहे त्यातच आराळा येथील गटारे तुंबली असून गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे स्टॅन्ड परिसर ते वडाचा नाका परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा ही प्रमुख बाजारपेठ आहे दर शनिवारी आठवडा बाजार येथे भरतो या ठिकाणी शाहूवाडी शिराळा व पाटण तालुक्यातील डोंगर दर्या कपाऱ्यातील लोक बाजार शिक्षण रुग्णालय यासाठी ये जा करत असतात अशा या आरळा गावातील कोकरूड चांदोली या मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी स्टँड परिसरात बँक परिसरात वडाचा नाका या परिसरात येऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तुंबून राहिले आहे या पाण्यामुळे रस्त्यावरून येजा करणाऱ्या प्रवाशांना घाणीच्या साम्राज्यांना सामोरे जावे लागत आहे या परिसरात अंगावर पाणी उडाल्याने छोटे मोठे वाद ही झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी सुद्धा केली नाही त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे बाजारपेठेतील काही दुकानांच्या समोर पाण्याची डबके साठून राहिलेले आहेत त्यामुळे व्यापारी वर्ग ग्राहक व ग्रामस्थ यांच्यामध्ये मोठी नाराजी पसरली आहे आरळा येथील गटारीच्या पाण्याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्यातुन होत आहे