पैठण,दिं.१०.(प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांनी पैठण तालुक्यातील कामाचा आढावा बाबत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विस्ताराधिकारी तसेच इंजिनियर यांची शासकीय कामा बाबत आढावा बैठक जिल्हा परिषद सर्कल निहाय घेण्यात आली.
यावेळी मंत्री संदिपान भुमरे यांचा सत्कार ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडू वीर तसेच सुहास पाटील जिल्हा सरचिटणीस, दशरथ खराद , संदीप घालमे, रमेश आघाव,जिजाभाऊ मिसाळ , राजेंद्र दिलवाले, संदीप खरात, इत्यादी हजर होते