कोपरगाव…:
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा शिंदेवस्ती नवीन पोहेगाव येथे स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मेजर सिद्धार्थ अशोक पाडेकर स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत राज्य गीत ध्वजगीत घेऊन घोषणा देण्यात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे लेझीम नृत्य सादर केले तसेच परेड देखील सादर करण्यातआले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोपाळे मॅडम यांनी केले. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या ३० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण केले. भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त शाळेला मिशन आपुलकी अंतर्गत मेजर आदरणीय सिद्धार्थ भाऊ पाडेकर यांचे कडून ब्लूटूथ स्पीकर माईक, शाळा व्यवस्थापन शिक्षण तज्ञ आदरणीय अमोलभाऊ शिवाजीराव औताडे यांचेकडून ऑफिस टेबल, .दिलीप खंडेराव सोनवणे पाणी जार २, योगेश भाऊ शिरोळे यांचे कडून पाणी नळी १०० फूट, अशा एकूण १६०००रू. वस्तू शाळेसाठी भेट मिळाल्या. सर्व दात्यांचे ,पालकांचे , मुख्याध्यापक, शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती तर्फे आभार मानले. तसेच
शाळेत मेजर, पालक ,ग्रामस्थ यांच्या हस्ते वृक्षारोपण शाळेत करण्यात आले , पालक योगेश शिरोळे नाना शिंदे अमोल दादा अवताडे सुदाम राहणे सिद्धार्थ पाडेकर दादा डांगे संतोष त्रिभुवन भाऊसाहेब एरंडे शितल डांगे लता डांगे सुनिता डांगे सूर्यभान डांगे संतोष देशमुख विजय देशमुख बाळू डांगे गोविंदाने निलेश जाधव दिलीप शिंदे नितीन त्रिभुवन दिलीप सोनवणे अमोल त्रिभुवन संगीता पवार जया शिंदे सुवर्णा शिंदे सुजाता शिंदे मंगल देशमुख संगीता अवताडे काल एरंडे महेश गुंजाळ सुदाम देशमुख रामनाथ शिंदे सुरेखा डांगे नंदा शिंदे आरती त्रिभुवन अमृता मुंगसे अंजली त्रिभुवन सखुबाई गोरे सुनीता मोरे मनीषा शिंदे राहुल गीते अंकुश देशमुख राधाकिसन राहणे जालिंदर पेटारे महेश कुंदा गुंजाळ आदी पालक ग्रामस्थमोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मुठे यांनी मांनले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.