सातारा/अनिल वीर : जिल्ह्याचे सुपुत्र असणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हयातभर परिवर्तनाचे कार्य केले होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असून कार्य दिपस्तंभासारखे अतुलनीय व चिरंतन राहील.त्यासमुळेच ते विवेकाच्या नोबेल पुरस्कारास पात्र ठरतात. असे प्रतिपादन लोकमंगल शिक्षण ग्रुपचे संस्थापक शिरीष चिटणीस यांनी केले
डॉ.नरेंद्र दाभोलकर विचार घरोघरी या उपक्रमतील १२ पुस्तकांचे लोकार्पण सोहळा येथील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये संपन्न झाले.तेव्हा शिरीष चिटणीस मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य वंदना नलवडे होत्या.चिटणीस पुढे म्हणाले की,”डॉ. दाभोलकरांचे लिखाण हिंदी, इंग्रजी भाषेत भाषांतरित झाले आहे. त्यास प्रचंड मागणी देशभर आहे.सद्या २० राज्यात त्यांचा सृतिदिन अनेक शाखामधून होत आहे. सातारा साहित्य संमेलनावेळी त्यांची कल्पकता ही आदर्श ठरली होती.साधनाचे काम व इतर काम पाहता त्यांना दीर्घ आयुष्य लाभले असते.” डॉक्टरांना विवेकाचा नोबेल पुरस्कार मिळायला पाहिजे.एवढे मोठे महान कार्य आहे.असाही पुनरुच्चार चिटणीस यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केला. बंधुत्व पुरस्कार विजेते उदय चव्हाण यांनी प्रास्ताविकपर म्हणाले, “चंद्रयान – ३ हे चंद्रावर थोड्याच दिवसात उतरणार आहे. त्याचवेळी समृद्धी महामार्गावर मृत्युंजय यंत्र काही लोकांनी बसवून ५ कि.मी.अंतरात अपघात होणार नाही.असे सांगत लोकांची फसवणूक केली आहे. हा विरोधाभास असून वैज्ञानिक दृष्टीकोन न बाळगल्यामुळे दिसतो.” अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या वंदना नलवडे यांनी शिक्षण क्षेत्रातील डॉ. दाभोलकरांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे,वंदना माने,आर. वाय.जाधव,मगदूम,डॉ.दिपक माने,प्रशांत पोतदार,विलास भांदिगरे,भगवान रणदिवे,ऍड. हौसेराव धुमाळ,विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार, तसेच सर्व भावी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.