बारामती: मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची काल बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा उपकक्ष प्रमुख नागेशजी जाधव साहेब, तसेच जिल्हा उप समन्वयक सतीश गावडे साहेब,
कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती तालुका समन्वयक मंगेश खताळ, बारामती शहर समन्वयक कृष्णमूर्ती जगताप मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गोलांडे उपस्थित होते मल्हार क्लबचे अध्यक्ष बापूराव सोलणकर, भाजपाचे अनिल जगताप, भाजपाचे कर्जत माजी जिल्हा परिषद शांतिलाल नाना कोपनर, दापोडी गावचे माझीसरपंच युवराज रुपनवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच सर्व महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे नागेश जाधव यांनी उपस्थितांना विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच भविष्यात तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त गरजवंताना मदत कशी मिळवून देता येईल व ती करत असताना जी आवाहने समोर असतील त्यावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात बारामती तालुका समन्वयक मंगेश खताळ यांनी संपुर्ण आढावा मांडला तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नागेशजी जाधव साहेब यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आली. बैठकीच्या शेवटी जिल्हा उप समन्वयक सतीश गावडे यांनी आभार मानले व बैठक संपन्न झाली असे जाहिर केले.