आजचा दिवस *
दैनंदिन राशी भविष्य दिनांक 23 ऑगस्ट 2023
* शके 1945, शोभननाम संवत्सर, बुधवार, दि. 23 ऑगस्ट 2023, निज श्रावण शुक्ल सप्तमी, सीतला सप्तमी चंद्र-तुला राशीत नक्षत्र-स्वाती सकाळी 8 वा. 08 मि. पर्यंत नंतर विशाखा, सुर्योदय-सकाळी 6 वा. 23 मि., सुर्यास्त-सायं. 6 वा. 00 मि., राहूचा अशुभ काळ- दुपारी 12.00 ते 1.30 वा.पर्यंत.
आज चंद्र-तुला राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सकाळी 8 नंतर वर्ज दिवस आहे. आज बुध-चंद्र लाभयोग व गुरु-चंद्र प्रतियोग व चंद्र-शुक्र केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

-ः दैनंदिन राशी भविष्य ः–
1) मेष ः- आज तुमचा विशेष प्रभाव असणार आहे. अनेकबाबतीत तुम्हाला अनुकूलता लाभणार आहे. मनोबल उत्तम राहिल. वैवाहिक जीवनात सुसंवादाचे व आनंदी वातावरण राहिल. मानसिक उत्साह विशेष राहिल. मनोबल वाढेल.
2) वृषभ ः- दैनंदिन कामामध्ये अडचणी जाणविण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी रहातील. काहींचा वेळ अनावश्यक कामात जाणार आहे. मनोबल कमी राहिल. प्रवासात अडचणी जाणवतील. महत्वाच्या कामास विलंब लागणार आहे.
3) मिथुन ः- काहींचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. संतती सौख्य लाभेल. प्रियजनांसोबत वेळ घालवू शकाल. आनंदी व आशावादी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. आर्थिक बाबतीत समाधानकारक अनुभव येतील.
4) कर्क ः- मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहिल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. मान व प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहिल. कामे यशस्वी होणार आहेत.
5) सिंह ः- तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही विशेष उत्साहाने कार्यकरत रहाणार आहात. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल उत्तम राहिल.
6) कन्या ः- कौटूंबिक जीवनात आनंदी रहाणार आहात. तुमचे मनोबल उत्तम रहाणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक लाभाच्या दृष्टिने काही नवीन योजना आखाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल.
7) तुला ः- आरोग्य उत्तम लाभणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. तुमचा इतरांवर विशेष प्रभाव राहिल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. एकूणच आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टिने अनुकूल जाणार आहे.
8) वृश्चिक ः- महत्वाची कागदपत्रे व मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. कोणतेही आर्थिक धाडस टाळावे. महत्वाची कामे रखडणार अहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणविणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
9) धनु ः- आर्थिक लाभ होणार आहेत. कामाचा ताण कमी राहिल. प्रियजनांसमवेत वेळ घालवू शकाल. बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. व्यवसायातील आर्थिक उलाढाल वाढेल. मनोबल उत्तम राहिल. कामे यशस्वी होणार आहेत.
10) मकर ः- कामाचा ताण वाढणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. मनोबल उत्तम राहिल. व्यवसायातील महत्वाचे निर्णय अचुक ठरणार आहेत. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव राहिल. सार्वजनिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा लाभेल.
11) कुंभ ः- एखादा भाग्यकारक अनुभव येईल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहिल. आनंदी व आशावादी रहाल. कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
12) मीन ः- मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहावे लागेल. आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावित. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीमध्ये सावधानता हवी.