पिंपळगांव बसवंत (प्रतिनिधी)
कला व क्रीडा- खेळ मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.मानवाच्या जीवनात उत्तम आरोग्य, प्रभावी व्यक्तिमत्व हिच खरी संपत्ती, समृध्द जीवनाची गुरुकिल्ली होय.खेळाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास,राष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत तर होतातच सोबतच सांघिक भावना उन्नत होतात. देशाच्या परिवर्तनशील लोकप्रबोधक कला- देशी-विदेशी खेळ तथा क्रीडा क्षेत्रातील उन्नतीसाठी राष्ट्रीय व राज्य कला-क्रीडा विद्यापीठ आणि जिल्हा- तालुकास्तरावर कला-क्रीडा विद्यालय स्थापन करण्यात यावी ह्या मागणी करता अध्यापकभारती व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र सन २००० पासून विविध आंदोलन,सत्याग्रह,ठिय्या, सह्यांच्या मोहिमांद्वारे सरकारकडे सातत्याने मागणी करत असून येथील कर्मवीर गणपत दादा मोरे माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कला व क्रीडा विद्यापीठ स्थापने साठी सह्यांची मोहीम घेण्यात आली.
अध्यापकभारती, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक शरद शेजवळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.के.धुळे व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियानच्या मुख्य मागण्या : प्रमुख मागण्या
राष्ट्रीय व राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना केंद्र राज्याने करावी, नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर तालुका, जिल्हा स्तरावर निवासी कला-क्रीडा विद्यालय, महाविद्यालय स्थापन करावीत.
१) अनुदानित-विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी संख्ये प्रमाणे कला- क्रीडा व कार्यानुभव,संगणक शिक्षक न
नियुक्त करावेत. २) महाराष्ट्र शासनाने २००२ मध्ये घोषीत केलेले क्रीडा धेारण त्वरीत अंमलात आणावे. ३) जिल्हा स्तरावरील कला-क्रीडा प्रबोधिनीची- प्रवेश क्षमता यात वाढ करावी. ४) शाळा- महाविद्यालय विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धा- प्रशिक्षण या करीता जास्तीत जास्त अर्थिक तरतुद करण्यात यावी. ५) महाराष्ट्र शासनाने यापुर्वी घोषीत केलेल्या मिनिऑल्मपिक स्पर्धा दर २ वर्षा आड त्वरीत सुरु कराव्यात. ६) तालुका स्तरावरील क्रीडा संकुले-खेळाची मैदाने यांच्या कामाला गती द्यावी व ते लवकरात लवकर पूर्ण करुन लोकार्पित करावेत. ७) शाळा- महाविद्यालय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या गरिब, ग्रामीण, कष्टकरी विद्यार्थी मुला-मुलींना केंद्र व राज्य सरकारने दत्तक घेवुन त्यांच्या कला-क्रीडा,कार्यानुभव, संगणक शिक्षण प्रशिक्षणाची जबाबदारी घ्यावी. ८) खेळाडुंच्या शासकीय नोकरी नियुक्तीत पारदर्शकता आणावी व त्यांना सन्मानाने वागवावे.९) कला-क्रीडा,संगणक व कार्यानुभव हे विषय शाळा महाविद्यालयात अनिवार्य विषय म्हणून शिकविले जावेत. १०) स्वतंत्र कला-क्रीडा,कार्यानुभव,कार्यानुव विद्यालयांची स्थापना करण्यात यावी.अशा प्रमुख मागण्या संदर्भात केंद्र व राज्य सरकार कडे सह्यांची पत्र पाठवले जाणार आहे.
ह्या प्रसंगी पी.के.धुळे,शरद शेजवळ,सरला डंबाळे, पुष्पा आहेर,संजय मोते,चित्रा राजगुरू, अर्चना धात्रक, मोहन कुशारे, शरद मोरे, जयश्री लोखंडे,कैलास दुसाने,अर्चना गडाख,जगदीश कुशारे,संदीप गडाख,स्वप्ना शिरसागर,संदीप भामरे,मीनल गवळी, रेश्मा जाधव, राहुल मोरे, सचिन रणशिंगे, अनिकेत बोराडे उपस्थित होते.