ताई गं ..
स्नेह मधाळ भावना
कळते हृदय स्पंदना
अडवू शकेल कोण
आपल्या रक्षाबंधना
असो छोटीबडीराखी
महत्वाची गं भावना
पर्याय नव्हता काही
सुरक्षित या जीवना
मनाने होतीस जवळ
सुखावे हीचं कल्पना
आनंदी माझीभगिनी
हेही सुख गंअल्प ना
परस्त्रीस माने बहीण
जळून गेली वासना
रक्षाबंधन नसा नसा
नसावा आव उसना
वाटे चंद्र जवळ आहे
हीचं गोड गं संवेदना
मना मनात राहे सदा
निघून जाईलं वेदना
संपले सरले मळभ ते
बहीण भेटली पुन्हा
नाते बंधन हे रेशमाचे
पाझरत राहीलं पान्हां
विरहातून नात्यांच्या
जाणवे ख-या खुणा
नात्या वाचून माणूस
आहे खरोखरी उणा
–
२)
रक्षा बंधन ..
(तळमळ)
थकले वाट पाहून
नयनरूपी निरांजनं
ये आता भाऊ राया
आज बा रक्षा बंधन
आठवणीत उमाळा
हृदया स्नेही स्पंदन
नात्यात ओढ अशी
खुलते आनंद नंदन
लावू तुझे कपाळा
सुगंधी टिळा चंदन
वाट पाहते द्रौपदी
येईना देवकी नंदन
अंतर पडले भेटीत
काळासम क्षणक्षण
अधीर बधीर थाळी
कराया तुझे औक्षण
पंच पक्वान्ने केली
केली किती व्यंजन
घास पहिला तुझा
तेंव्हा संपूर्ण भोजन
राहतोस परदेशात
सणसर्वं ऑनलाईन
कधी प्रत्यक्ष पाहीन
होणेपूर्व ऑफलाईन
बांधी अद्रृश्य राखी
दे कैक आशीर्वचन
अंत पाहू नको गा
पाळा आपले वचन
–हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com