सोनेवाडी ग्रामसभास उंचाकी गर्दी ग्रामस्थांचाही दाभाडेंना पाठिंबा
कोपरगाव(वार्ताहर) : तीव्र शांतता.. हातात पेन.. विकासाच्या फाइली… अर्ज.. नियोजन.. केंद्र महाराष्ट्र शासनाची विविध विकास कामांची माहिती ग्रामस्थांसमोर भानदास दाभाडे यांनी आपल्या ग्रामविकास अधिकारी पदाचा चार्ज स्वीकारल्यानंतर मांडली. त्यांची ही कालची पहिलीच ग्रामसभा ग्रामस्थांनीही दाभाडे यांना भरभरून पाठिंबा दिला. दाभाडे यांनी दिलेल्या विकासाच्या सार्थ हाकेला ग्रामस्थांनी हात उंचावत साथ दिली. ग्रामस्थांची साथ मिळाल्यानंतर येत्या पाच वर्षात विकासाचा डोंगर उभा करतो केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गावात राबवून गावाचा कायापालट करतो असा शब्दच ग्रामसभेत भानुदास दाभाडे यांनी दिला. सर्व ग्रामस्थांची मने त्यांनी जिंकत कामकाजाला सुरुवात केली.सरपंच शकुंतला गुडघे यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा खेळीवेळीच्या वातावरणात पार पडली.गावातील वाड्यावर पाण्याची सुविधा जल जीवन योजनेअंतर्गत पूर्ण करण्यासाठी नव्यानेच दहा लाख रुपयांचा निधी दाभाडे यांनी मंजूर करून आणला. एक कोटी रुपयांची ही योजना गावात सध्या सुरू आहे.ग्रामसभा म्हटलं की आरडाओरडा, गोंधळ ,विषय पत्रिकेवरील विषय संपायच्या आत ग्रामसभा गुंडाळण्याची स्टाईल यामुळे विकासाला हात घालता येत नाही. विकासाची काम करण्याची इच्छा असतानाही अधिकाऱ्यांना काम करता येत नाही त्यामुळे इथून पुढे तुमचे कोणतेही काम असो त्यासाठी मला वेळ द्या काम करण्याची पूर्ण जबाबदारी मी स्विकारतो असे आश्वासन ग्रामसभेला उभे राहतात दाभाडे यांनी दिले.कोपरगाव तालुक्यात जवळपास बारा ग्रामपंचायती व 24 वर्ष प्रदिर्घ सेवेचा अनुभव सोनेवाडी ग्रामपंचायत तेरावी.सेवानिवृत्त व्हायला केवळ पाच वर्ष, एकाच वेळेस तीन हृदयविकाराचे झटके, शरीराचे बायपास, दैव बलवत्तर म्हणून मिळालेले उर्वरित पाच वर्षाचे बोनस आयुष्य विकास कामाला देत असल्याची भावनिक आवाहन त्यांनी केले.गावातील विविध मूलभूत गरजा वीज, पाणी ,रस्ते , स्मशान भूमी, शैक्षणिकदृष्ट्या शाळेमध्ये विविध उपाय योजना त्यांनी ग्रामस्थांसमोर मांडल्या.ग्रामसभेत पारदर्शक पद्धतीचा लेखाजोगा सादर केल्यानंतर आयुष्यातील पहिलीच ग्रामसभा असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. यावेळी उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, बाबासाहेब फटांगरे,व्यंकटराव जावळे, राजेंद्र गुडघे, साहेबराव फटांगरे , किशोर जावळे, बाळासाहेब जावळे ,बबलू जावळे, संदीप गुडघे, शिवाजी जावळे, व्यंकटराव राऊत, कैलास गुडघे, नंदू जायपत्रे, पोलीस पाटील दगू गुडघे, विजय जगताप, पप्पू शिंदे, कर्ना जावळे शशिकांत लांडगे ,विजय फटांगरे,आबासाहेब जावळे, चिलु जावळे, बापूराव जावळे, केशव जावळे, विठ्ठल जावळे ,हेमराज जावळे ,दिगंबर जावळे, आबा दहे, प्रभाकर जावळे, यमाजी जावळे, गजानन गुडघे, साईकांत होन, दीपक जावळे , भाऊसाहेब खरे ,मच्छिंद्र गुडघे, सिताराम गांगुर्डे ,पुंजाहरी आव्हाड, लक्ष्मण ठाकरे आनाजी जावळे, गिरधर जावळे अदी उपस्थित होते.शेवटी सरपंच शकुंतला गुडघे यांनी सर्वांचे आभार मानले.