जामखेड तालुका प्रतिनिधी – केंद्रातील भाजपा सरकारचे अन्यायकारक धोरण, भ्रष्टाचार, लोकशाहीची गळचेपी आणी सत्तेचा गैरवापर या विरोधात जनमाणंसामधे जागृती करण्याच्या हेतुने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे वतीने दि. ३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर जनसंवाद यात्रेचे आयोजन महाराष्ट्र भर करण्यात आले आहे.गावोगाव काँग्रेस पक्षाचे वतीने पदयात्रेचे आयोजन करुन जनसामान्यांना भेटून मोदी सरकारचे गेल्या नऊ वर्षांतील अपयश मांडण्यात येणार आहे.
या जनसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी गुरुवार दि.३१ ऑगस्ट रोजी जामखेड तालुका काँग्रेस पक्षाची बैठक ता. अध्यक्ष शहाजी राजेभोसले यांचे अध्यक्षतेखाली व युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव राहुल उगले,महीला काँग्रेस अध्यक्षा ज्योती गोलेकर ,यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
दि. ४ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व मान्यवराचे उपस्थितीत या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे.जामखेड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते अहमदनगर येथील यात्रेत सहभागी होणार आहेत.
जामखेड तालुक्यातील ७० गांवामधे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जनसंवाद यात्रेनिमित्त केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणां बाबत जनजागृती करणार आहे.
जामखेड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या या बैठकीत तीन ठराव मांडले व पास करून ते प्रदेश काँग्रेस ला पाठविण्यात आले. लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहीजे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, या सुचनेस जामखेड महिला तालुकाध्यक्ष ज्योती गोलेकर यांनी अनुमोदन दिले.
माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचे काँग्रेस पक्षातील निलबंन रद्द करुन त्यांना काँग्रेस पक्षात सन्मानाने सहभागी करून घ्यावे अशी सुचना युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राहुल उगले यांनी मांडली व अनुमोदन शिवराज घुमरे यांनी दिले. सर्व काँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा ठराव संमत करण्यात आले.
या बैठकीसाठी किसान कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गौतम पवार, अल्पसंख्याक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, विशाल डूचे,चेअरमन अशोक पाटील,दादासाहेब पवार,शहराध्यक्ष संदीप बोराटे,अल्पसंख्याक कॉंग्रेस शहराध्यक्ष जावेद शेख,युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज घुमरे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले, विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष आदेश सरोदे,अनिकेत जाधव भागीनाथ उगले यांचेसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.