पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात थोर साहित्यिक यांचे विचारपुष्प
पाडळी /सिन्नर :पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष साहित्यिक प्राचार्य दत्तात्रय आहेर यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर प्रगट केले.त्यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित करतांना आपले ध्येय निश्चित करा व त्या ध्येयाप्रती आपले उदिष्ट गाठा.विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवून स्वामी विवेकांनदासारखे महान तत्त्ववेत्ता बना.यासाठी स्वामी विवेकांनदांचे विचार अंगीकारून उठा,जागे व्हा,ध्येय गाठेपर्यंत थांबू नका त्यासाठी परिश्रम करा हा मोलाचा संदेश स्वामी विवेकानंदांनी देऊ केला तो आपण सार्थ ठरू या.आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करा त्यासाठी कुठेही बाहेर न जाता विश्व एक व्यायाम शाळा असे स्वामी विवेकांनदानी सांगितले. कोणतेही काम करतांना कामना,इच्छा,लोभ,मत्सर व आळस यांना हद्दपार करा. आपल्या विचारांना प्रत्यक्ष आचरणात आणा,आपण निर्भय बना,आत्मबल वाढवा. आपल्या प्रभावी भाषा शैलीतून प्राचार्य दत्तात्रय आहेर यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून स्वामी विवेकानदांच्या विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपण थोर,लेखक,साहित्यिक,कवी व व्याख्याते यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचार शैलीला प्रेरणा देऊन थोर व्यक्तींच्या चारित्र्यातून बोध घेऊन आपणही त्या सम घडावे यासाठी तज्ञ विचारवंताचे मौलिक विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारुन आपले ध्येय निश्चित करावे.यासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्न करून जिल्ह्यातील नामवंत कवी,थोर,साहित्यिक व लेखक यांच्या भेटी विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण घ्यावे.तसेच एका निर्णयावर ठाम न राहता परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा . आपलं ध्येय साध्य झाल्यावर एखादा छंद जोपासावा आपले गुण ओळखून आपले भविष्य घडवावे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व साहित्यिक दत्तात्रय आहेर यांचा परिचय सौ.सविता देशमुख यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.व्ही.निकम यांनी केले व आभार शिंदे सी.बी.यांनी मानले.
याप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी,एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस. डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.