कोपरगाव : चितळी,दिघी,लांडेवाडी या भागात निळवंडे पाट पाणी पोहचण्यासाठी आवश्यक बोगद्याच्या अंतिम ब्लास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे.सदर प्रवाहकाच्या माध्यमातून हजारो एकर शेती निळवंडे पाण्याखाली येण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.रेल्वे विभागाचे व या कठीण कामात सहकार्य करणारे अधिकारी,कर्मचारी यांचे शेतकरी वर्गातून कौतुक करण्यात येत असून निळवंडे धरणासह कालवे पूर्ण झाले पाहिजे यासाठी भाजपा नेत्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची मोठी भूमिका राहिल्याबद्दल या भागातील शेतकरी बांधवानी कोल्हे यांचे प्रयत्न सफल झाल्याने अभिनंदन केले आहे अशी माहिती विक्रम वाघ व परिसरातील कार्यकर्ते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निळवंडे धरणाचे काम होऊन त्यासाठी भरीव निधी मिळावा या कामी भाजपा नेत्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले होते त्याची फलश्रुती होताना दिसून येत आहे. आमच्या शेतीचे नंदनवन होण्याच्या दृष्टीने निळवंडे पाणी फार मोलाचे ठरणार आहे.कालव्याद्वारे पाणी शिवरात पोहचण्यासाठी फार मोठे काम मार्गी लागले आहे. चितळी येथील रेल्वे मार्गा अंतर्गत असणाऱ्या बोगद्याच्या माध्यमातून पाणी पोहचण्याचा मार्ग गणेश चतुर्थीच्या पावन मुहर्तावर मोकळा झाला आहे.लवकरच या यशस्वी कामामुळे शेतकरी ऐन दुष्काळात सुखावला जाणार असल्याचे चित्र लाभक्षेत्रातील सर्व भागात निर्माण झाले आहे.
श्रीरामपूर वाकडी येथील रस्त्यालगत काम बंद पडले असता त्यातून मार्ग निघाल्याने या कामासाठी गती आली.धरणाचे लाभ क्षेत्र आणि शेतकरी यांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या असून शिवार हिरवे होण्यासाठी निळवंडे वरदान ठरणार आहे.
या कामासाठी निळवंडे पाट पाणी कृती समितीचे नानासाहेब शेळके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व शेतकरी वर्गाने मोठी साथ या कामी दिली आहे त्यांनाही धन्यवाद दिले आहेत.