सिन्नर : १४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर हिंदी दिवस सप्ताहाच्या निमित्ताने पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात बाल साहित्य संम्मेलन विविध उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी भूषविले यानिमित्ताने हिंदी भाषा ही संपर्क भाषा असून प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक दिवस तरी हिंदी भाषेतून बोलावे,जास्तीत जास्त हिंदी पुस्तके वाचून आपले हिंदी भाषे विषयीचे ज्ञान वाढवावे असे सांगितले.
यावेळी सौ.सविता देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेतून हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश व महत्व सांगताना हिंदी दिवसाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची सविस्तर माहिती दिली.हिंदी भारत देशकी मातृभाषा गर्वसे स्वीकारते है! हम हिंदी भाषी है! भारत हा एक असा देश आहे जिथे अधिक संस्कृती आहे.या सांस्कृतिक भिन्नतेमध्ये हिंदी ही भाषा समाविष्ट होते.याचे कारण हिंदीचा आपल्या देशात असणारा प्रभाव .. आजही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी एक भाषा,तिचा सन्मान म्हणून १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करतात. आपली भारतीय संस्कृती समजण्यासाठी हिंदी जाणून घेणे आवश्यक आहे.हिंदी भाषेमुळे देशाची एकता आणि अखंडता कायम राखली जाते .
यावेळी विद्यालयातील इ.५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात आरोही शिंदे,रुही रेवगडे-बॅूदे, साहिल रेवगडे,सनी शिंदे-नीम, मयूर पाटील,कार्तिक चव्हाण–चुटकुले,ज्ञानेश्वरी वारुंगसे,श्रुतिका रेवगडे-सोई मेरी छौना रे माया रेवगडे,स्वरांजली पाटोळे – नदी कंधे पर, ज्ञानेश्वरी वारुंगसे – मुहॉवरे,जयश्री रेवगडे,वैष्णवी शिंदे,मानसी पाटोळे,अक्षदा जाधव ऋतुजा रेवगडे – बंदर का धंधा ,श्रावणी पोटे,अंजली पाटोळे – फुल और काँटे,आयुष शिंदे,सार्थक शिंदे,प्रतिक्षा शिंदे,श्रुती जाधव – नाटिका सोहम पाटोळे – हिंदी भाषा दिवसाची माहिती सांगितली , मुहॉवरे,चुटकुलें संवाद यांचे उत्कृष्टरीत्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे, बी.आर.चव्हाण,आर.व्ही. निकम,एस.एम. कोटकर,आर.टी. गिरी, एम.सी. शिंगोटे, एम.एम.शेख, सी.बी.शिंदे,के.डी. गांगुर्डे,एस.डी.पाटोळे, आर.एस. ढोली, ए.बी. थोरे उपस्थित होते.