विचारांना चालना देवून जीवनात यशस्वी व्हालेप्टनंट कर्नल मच्छिंद्र शिरसाट

0

मला अधिकारी व्हायचं या उपक्रमांतर्गत कर्नल शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना केले उद्बोधित

सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात भूदल,नौदल व वायुदलात जाण्याचे ध्येय निश्चित करून त्याला प्रचंड मेह्नतीची जोड देऊन आपल्या जीवनाचे ध्येय गाठा.मनातील भितीला दुर सारून आयुष्यात पालकांच्या व गुरुजनांच्या मार्गदर्शनातून खुप मोठे व्हा.यासाठी शालेय जीवनात शारीरिक क्षमता स्वत:मध्ये निर्माण करून कठीण परिश्रमाची सवय अंगी बाळगा व कोणत्याही परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.शारीरिक क्षमता निर्माण करण्यासाठी व्यायाम व शारीरिक कसरतींचा सराव सातत्याने करा.यासाठी महाविद्यालयीन जीवनात एन.सी.सी.सोबत अभ्यासाची सांगड घालून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरा व आपल्या ग्रामीण भागातील कला कौशल्याची जोड देऊन मेहनत करा.इंग्रजी भाषेचा बाऊ न करता प्रयत्न करा निश्चित यश मिळेल.
लेप्टनंट कर्नल श्री मच्छिंद्र शिरसाट यांनी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून देण्यासाठी अनेक भूदल, नौदल,वायुदलातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घडून आणण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संधी प्राप्त करून घ्यावी यासाठी मी माझ्या सेवेचा व ज्ञानाचा उपयोग करील असे सांगितले.मी ग्रामीण भागातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भूदलात शिपाई पदापासून ते स्वमेह्नतीने कर्नल पदापर्यंत पोहचलो ते माझ्या जिद्द व चिकाटीवर असे सांगितले.कोणत्याही कामाची लाज बाळगू नका,परिश्रम करण्याची सवय अंगी बाळगा जीवनात जास्तीतजास्त पुस्तकांचे वाचन करा,अभ्यासाच्या तीन पध्दती नेहमी लक्षात ठेवा . NDA सारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मला अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण करा.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.बी.देशमुख यांनी खरे सोने ग्रामीण भागात असते व त्याची प्रचिती आपल्या परिसरातील ठाणगावचे भूमिपुत्र श्री मच्छिंद्र शिरसाट यांनी प्रचंड मेहनत, जिद्द व आकांक्षा या जोरावर मिळविलेले भूदलातील कर्नल पद त्यांच्या प्रशिक्षण काळात शिपाई पदापासून प्रयत्न करून मिळविलेले यश व आपले कर्नल पदापर्यंत जाण्याचे स्वप्न साकार केले.तसेच उच्च ध्येय व मनात खुणगाठ बांधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पालक,गुरुजन यांच्या मार्गदर्शनातून पुढे जावे हा सल्ला दिला.शालेय जीवनात कोणत्याही कामाची लाज बाळगू नका.मात्र कोणतेही काम ईमानदारीने करा.म्हणजे जीवनात यशस्वी व्हाल,स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी शालेय जीवनात अंगीकारा म्हणजे तुमचे ध्येय गाठून तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण कराल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथी परिचय सौ.सविता देशमुख यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.व्ही.निकम यांनी केले व आभार आर.टी.गिरी यांनी मानले.
याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे, धनंजय रेवगडे ,सामाजिक देणगीदार अशोक घुले पाटील,बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे तसेच विद्यालयातील शिक्षक बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी, एम.सी.शिंगोटे, एम.एम.शेख,सविता देशमुख, सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here