माजी युवा नगरसेवक भूषण काका कावसानकर राबवणार उपक्रम
पैठण,दिं.२७(प्रतिनिधी):पैठण शहरातील सार्वजनिक गणेश व घरगुती गणेशमूर्तीच्या.विसर्जनानंतर २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर असे दोन दिवस निर्माल्य संकलनाचा उपक्रम युवा माजी नगरसेवक भूषण काका कावसानकर यांच्या वतीने राबवण्यात येणार आहे. पैठण शहरात सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती असे दोन हजारांहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. एक-दीड टन निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. यासाठी भूषण कावसानकर यांनी एक वाहन उपलब्ध करून देत थेट मंडळाच्या ठिकाणी जाऊन निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवणार आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीपात्रात टाकू नये. निर्माल्यातील फळे, नारळ, तांदूळ, गहू, खारीक, बदाम, हळकुंड, देवदेवतांचे फोटो, कापडी पिशवी, पान व फुले, नैवेद्य, डेकोरेशन साहित्य, हराळ याचे वर्गीकरण करण्यात येणार असून ” ‘दान करा निर्माल्याचे, पावित्र्य राखा नदीचे’ अशी साद घालत गणेश भक्तांना भुषण कावसानकर यांनी आवाहन केले आहे.