घेत आहेत निरोप
आता गुलाबी नोटा
पाहून घ्यावे रुपडे
करा बायबाय टाटा…
अदला बदल करा
नको उगाचं घाटा
उद्याला रद्दी कागद
कशाला सोसू तोटा….
वाजतगाजतआली
तो केवढा नट्टा पट्टा
मोठी थोरलीबहीण
अडवून ठेवते वाटा….
गरीबा दर्शन दूरुन
करे हेटाळणी थट्टा
हवा मालक श्रीमंत
भलताचं धट्टा कट्टा….
चालायां जड नोटा
रे कुणी देईना सुट्टा
सोपी असेलअगदी
खेळायं जुगार सट्टा…
मस्तीसगळी नडली
उगाचं पेटलेली हट्टा
बाद होई चलनातून
भंगारात तिला भेटा……
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996