पैठण,दिं.९:(प्रतिनिधी) Paithan पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात दिपावली सणाच्या पहिल्या दिवशी Diwali Wasubara वसुबारस हा सण शेतकरी विनोदकुमार मुंदडा यांनी आपल्या गोधनाची पुजा करून गोधनास गुळ व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून मोठ्या उत्साहात साजरा केला.
गोधन हे अतिशय उत्तम मानले जात असल्याने या दिवशी गोपूजेला विशेष महत्त्व आहे.म्हणून वसुबारसेला गाईला बाजरीची भाकरी-गूळ आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य, पारंपरिक पध्दतीने दाखविण्यात आला.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस यालाच गोवत्स द्वादशी म्हणून ओळखले जाते. दिवाळीचा पहिला दिवा म्हणजेच हा दिवस. अर्थातच गायीची पूजा करुन दिवाळीची सुरुवात करण्यात येते. वर्षानुवर्षे ही परंपरा पाळत गोधनाची मनोभावे पूजा केली जाते गोधन हे अतिशय उत्तम मानले जात असल्याने या दिवशी गोपूजेला विशेष महत्त्व आहे. देवता मानलेल्या गायीला गोडाचा आणि भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामागे धार्मिक कारणे असतील तरी आरोग्याच्या दृष्टीनेही हे पदार्थ खाण्यास सुरुवात केली जाते. गूळ, बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी असा नैवेद्य या दिवशी आवर्जून केला जातो त्यामागे नेमके काय महत्त्व आहे ते पाहूया
गूळ खाण्याचे महत्त्व
थंडीच्या दिवसांत गोड खाल्ल्याने थंडीपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणून या काळात गूळ आवर्जून खाल्ला जातो. गुळामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण त्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली राखण्यासाठी गूळ आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजरीच्या भाकरीसोबत गुळ आणि तूप घालून खाल्ल्यास थंडीच्या काळात हा अतिशय उत्तम आहार ठरु शकतो.
थंडीत बाजरी आरोग्यदायी
दिवाळी म्हणजे साधारपणे थंडी सुरू होण्याचा कालावधी. थंडीमध्ये साधारणपणे बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते. शरीरातील उष्णता दिर्घकाळ टिकून राहावी यासाठी बाजरी उपयुक्त असते. गायीला आपल्या संस्कृतीत देव मानलेले असल्याने गायीची पूजा करुन तिला नैवेद्य दाखवून मग आपण तो खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे वसुबारसेमागे धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या असे दोन्ही महत्त्व असून ते आपण लक्षात घ्यायला हवे.