तोतया व बोगस पत्रकार यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करा – नागरिकांची मागणी
जामखेड तालुका प्रतिनिधी – महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचण्यासाठी तालुक्यात दुचाकी वाहनाबरोबरच चारचाकी खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन नावाबरोबरच प्रेस नावाच्या पाट्यांचा सर्रास दुरुपयोग होताना सध्या पाहायला मिळत असून, परिवहन व पोलिस प्रशासनाने यावर योग्य पाऊले उचलायला हवीत, अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहर आणि जामखेड तालुक्यात तोतया पत्रकारांची संख्या वाढली असुन तोतया पत्रकार मोबाईल वर स्वता टाईप करून अधिकारी व एखादा राजकीय नेत्याच्या विरोधात बातमी म्हणून लिहतात व ती बातमी व्हाटसप ग्रुपवर टाकातात. समोरच्याकडुन वसुलीही करतात. असे काळे धंदे जामखेड शहरासह तालुक्यात तोतया पत्रकारांचे सर्सास सुरू असुन व तसेच ते पत्रकार नसुन गाडीवर प्रेस नावाचा गैरवापर केला जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून पैसे वसूल करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. अशा तोतया पत्रकारामुळे प्रसारमाध्यमांची बदनामी होण्यासह प्रामाणिक पत्रकाराकडे देखील वेगळ्या नजरेने नागरिक सह अधिकारी पहात आहे. प्रेस म्हटले की पोलीस वाहन अडवत नाहीत. अशी समज लोकांमध्ये निर्माण झाली आहे. फोटोग्राफर म्हणून काम करणारे देखील वाहनांवर प्रेस लिहत आहेत. गांभीर्याची बाब म्हणजे ज्यांचा प्रेसशी कोणताही संबंध नाही. ते देखील आपल्या वाहनांवर प्रेस असे मोठया अक्षरात लिहून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत फिरत आहेत. असे तोतया पत्रकार पोलीस खात्यासाठी देखील डोकेदुखी बनले आहेत.
त्यामुळे ही बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतली पाहिजे होती. त्यामुळे पोलिसांनी प्रेस लिहिलेल्या वाहनांची अडवणूक करून चौकशी करून कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्याचा दूरच्या नात्यातील एखादी व्यक्ती प्रेसमध्ये असल्यास त्यांचे नातेवाईक आणि मित्र देखील वाहनांवर प्रेस लिहून फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतली पाहिजे तोतया पत्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आता वाहन तपासणी तीव्र करण्याची गरज आहे. प्रेसशी कोणताच संबंध नसलेल्या व्यक्ती पण वाहनांवर प्रेस लिहून फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात यावी. त्यामुळे बोगस पत्रकारांना कायदाचा धाक निर्माण होऊन बोगस पत्रकारांनधा आळा बसेल यासाठी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या वाहतुक शाखेचच्या पोलिसांनी तोतया पत्रकार व बोगस गाडी वर प्रेस नाव बद्दल कारवाई व गुन्हे दाखल करणे बाबतचे पत्र काढावे असे प्रमाणिक पत्रकारासह नागरिकांचे म्हणने आहे .
जामखेड तालुक्यात बोगस व तोतया पत्रकारांची संख्या वाढली असून पोलिसांसाठी देखील ते डोकेदुखी बनले आहेत.सध्या प्रत्येक ठिकाणी तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुरू आहे. कोणत्या तरी ऑनलाईनचा किंवा अस्तित्वात नसलेल्या वृत्तपत्राचे कार्ड तयार करायचे आणि आपल्या खासगी वाहनावर प्रेस असे बोर्ड लावून आपल्या कार्डची धमक दाखवत फिरायचे. मात्र, अशा प्रकारचे उद्योग तोतया व बोगस पत्रकारांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा तोतया, बोगस पत्रकारांनी वाहनांवर प्रेस असे स्टीकर लावून हैदोस घातला आहे. तरी अशा तोतया पत्रकारांची सखोल चौकशी करून यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी जामखेड तालुका सह ग्रामीण परिसरातील नागरिकांनी व प्रमाणिक पत्रकार यांच्या कडुन होत आहे