गुहा गावात पुजारी वभाविकांना मारहाण केल्याने दोन समाजात तणाव 

0

पोलिस फौजफाटा दाखल, परीस्थिती नियंञणात 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :

           राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आज पुन्हा उफाळून आला असून अमावस्यानिमित्त सुरू असलेल्या पुजा व धार्मिक कार्यक्रमात एका समाजाच्या पुरूष व महिलांच्या जमावाने शिरून पुजारी व भाविकांना मारहाण केल्याने गुहा गावात तणाव निर्माण झाला आहे. एका समाजाने दुपारी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसले होते.सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला नव्हता.  

गेल्या अनेक वर्षा पासुन येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. प्रशासनाने दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न ही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला.परंतू, आज दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्यानिमित्त पुजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला व भाविकांना दुसऱ्या एका समाजातील लोकांनी महिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण केली. या घटनेमुळे गावात दोन समाजात चांगलाच तणाव निर्माण झाला असून या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राहुरीचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.

                  गुहा गावातील एका समाजाने पुजाऱ्यास मारहाण केल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here