दौंड तालुका प्रतिनिधी, हरिभाऊ बळी :
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या बालस्नेहालय आणि वेदिका फाउंडेशन यांच्या वतीने चौफुला ( ता. दौंड ) येथील विटभट्टीवरील गरजू व गरीब १० कुटुंबांना थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी स्वेटर, कानटोपी आणि जर्किन्स दारात जाऊन वाटप करण्यात आले.
मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणारे बालस्नेहालय आणि वेदिका फाउंडेशन वतीने यावर्षी थंडीची चाहूल सुरू झाल्याने गरजू व गरीब कुटुंबांचे थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विटभट्टीवरील कामगार हे पहाटेपासून ते रात्री पर्यंत काम करत असतात. त्यांना मिळालेले स्वेटर, कानटोपी आणि जर्किन्स मुळे त्यांचे थंडीपासून रक्षण होणार असल्याने विटभट्टी कामगारांना दारात जाऊन स्वेटर, कानटोपी, जर्किन्स वाटप करण्यात आले. या वाटप कार्यक्रम प्रसंगी शबनम डफेदार ह्या उपस्थित होत्या.