कोपरगावकरांचा भार हलका केल्याबद्दल आ. आशुतोष काळेंनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार

0

कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या एकूण १३१.२४ कोटी निधीच्या १५ टक्के वर्गणीची रक्कम मिळवून देण्यात अनमोल सहकार्य केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करून ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी निधी दिला आहे. परंतु हा निधी मिळविण्यासाठी १५ टक्के निधी हा लोकवर्गणीतून राज्य सरकारला भरणे आवश्यक होते.त्यामुळे या १५ टक्के निधीचा जवळपास २० कोटीचा भार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोपरगावकरांवर पडणार होता. त्यामुळे हा कोपरगावकरांवर पडणारा हा भार कसा कमी करता येईल यासाठी आ.आशुतोष काळे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता.त्या पाठपुराव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यामुळे कोपरगावकरांचे १९ कोटी ६८ लक्ष६० हजार एवढी मोठी रक्कम वाचली आहे.यामागे पाठपुरावा जरी आ.आशुतोष काळे यांचा असला तरी आशीर्वाद मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे होते.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली व त्यांचे कोपरगाव करांच्या वतीने आभार मानले.यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचा झालेला कायापालट व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून यापुढील काळातही कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आपल्या शिलेदाराला अर्थात आ.आशुतोष काळे यांना दिली.

फोटो – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here