जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे येथे बाळ आनंदमेळावा साजरा.

0

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )

आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे, ता.उरण, जि. रायगड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बाळ आनंद मेळावा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उ‌द्घाटन शिक्षक-पालक संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, शिक्षक-पालक संघटनेचे सदस्य प्रदीप वर्तक, विश्रांती म्हात्रे उपस्थित होते.

या बाळ मेळाव्यात पहिली ते दहावी विद्यार्थ्यांनी एकूण ३० दुकाने मांडली होते. यामध्ये प्रथम क्रमांक दहावीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच गौरी गावंड, मनस्वी गावंड, प्रियांशी म्हात्रे, आर्या गावंड, अनघा पाटील, श्रुती म्हात्रे, सानिया गावंड यांनी पटकावला तसेच द्वितीय व तृतीय क्रमांक इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ध्रुवी गावंड, मृणाली म्हात्रे व इयत्ता पाचवीचा विद्यार्थी ध्वेन म्हात्रे यांनी पटकावला.उत्तेजनार्थ क्रमांक शमिका म्हात्रे हिने मिळवला.या बाळ मेळाव्यात विविध खेळ घेण्यात आले. व बाकीच्या विद्यार्थ्यांनी दुकाना मधील पदार्थ खरेदी केले. सर्वांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here